बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान आणि अमृता अरोरा यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. दोन बड्या सेलेब्सनी मुंबईतील पार्ट्यांमध्ये उपस्थित राहून अनेक कोरोना नियमांचे उल्लंघन केले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने करीना आणि अमृताच्या संपर्कात आलेल्या लोकांना RTPCT चाचणी करण्याची सूचना दिली आहे.
कोरोनाचा धोका नक्कीच कमी झाला आहे, पण टळलेला नाही. संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वात वाईट परिणाम महाराष्ट्रात दिसून आला, जो आत्तापर्यंत कायम आहे. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, अभिनेत्री करीना कपूर खान आणि अमृता अरोरा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे कळते आहे.
बीएमसीच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, करीना कपूर आणि अमृता अरोरा या सुपर स्प्रेडर असण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. दोघीही खूप चांगल्या मैत्रिणी आहेत आणि त्या अनेक बॉलिवूड स्टार्सना सतत भेटत असतात. तसेच, या दोन्ही अभिनेत्रींनी गेल्या काही दिवसांत बॉलिवूडच्या अनेक पार्ट्यांमध्ये हजेरी लावली आहे. बीएमसीने त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या संपर्कातील आणखी काही सेलिब्रिटींचे अहवाल आज समोर येऊ शकतात.
करीना कपूर आणि अमृता अरोरा व्यतिरिक्त करिश्मा कपूर, मलायका अरोरा अनेकदा पार्ट्यांमध्ये एकत्र दिसतात. अशा परिस्थितीत त्याच्या संपर्कात आलेल्या इतर बॉलिवूड स्टार्सनाही संसर्ग होण्याची भीती आहे.
नुकतीच करीना कपूर तिच्या गर्ल गँगसोबत पार्टी करताना दिसली होती. या पार्टीत तिची बहीण करिश्मा कपूर, मलायका अरोराही सामील झाली होती. ही पार्टी अनिल कपूरची मुलगी रिया कपूरच्या घरी ठेवण्यात आली होती. जिथे सगळ्यांनी एकत्र मस्त वेळ घालवला.