जळगावात एक काळजाला स्पर्श करून जाणारी घटना घडली आहे. सर्वांना आपले आई-वडील सर्वांना अत्यंत जवळचे असतात. पण ज्यांचे वडील नाहीत, त्याची व्यथाच वेगळी असते. जळगावातील एका लेकीने आपले वडील गेल्यानंतर लग्नात त्यांचे आशीर्वाद घेता येणार नाहीत, म्हणून वडीलांचा पुतळा तयार करून अनोखे लग्न केले आहे. सध्या या अनोख्या लग्नची चर्चा आहे. असे अनोखे लग्न तुम्हीही कधीच पाहिले नसेल.
या मुलीने आपल्या वडिलांचा पुतळा तयार करून त्या पुतळ्यासमोरच लग्नातील सात फेरे घेतले आहेत. ही घटना अनेकांच्या मनाला स्पर्श करून जाते. मृत्यूनंतर वडील आपल्यात असल्याची जाणीव राहवी या हेतून तिने हा मार्ग निवडला आहे. पाचोरा तालुक्यातील हा आगळावेगळा विवाह सोहळा आहे.
काही वर्षांपूर्वी वडीलांचे निधन झालेय. मात्र त्यांच्याशिवाय कसा विवाह सोहळा पार पाडायचा. म्हणून तरुणीने चक्क मयत झालेल्या वडिलांचा पुतळा तयार केला. या पुतळ्यासमोर सात फेरेही घेतले आणि अन् वडीलांचे आशिर्वादही. त्यामुळे या विवाह सोहळ्याची जोरदार चर्चा होत आहे. प्रत्येक मुलगी आपल्या बाबांची परी आणि मुलिचा पहिला हिरो तिचा वडील असतो. मुलं आईच्या जास्त जवळ असतात, तर मुली वडिलांशी जास्त जवळ असतात. तेच या बाबाच्या लाडक्या लेकीने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. कित्येकजण मात्र आई-वडील जीवंत असतात अशावेळी देखभाल करत नाहीत, मात्र ही मुलगी तिच्या बाबांचा मृत्यू होऊनही त्यांच्या उपस्थितीशिवाय लग्न करू शिकली नाही. तिच्या या प्रेमाचं कौतुक होतंय.