नाशिकमध्ये साहित्य संमेलनाची सांगता झाली. यावेळी अनेक मान्यवर नेत्यांनी हजेरी लावून आपले विचार मांडले. दरवेळी साहित्य संमेलन आणि वाद हा ठरलेलाच झाल्याने शरद पवारांनी यावेळी कान उपटले आहेत. साहित्य समेलन चांगले विचार ऐकण्यासाठी असते, दरवेळी साहित्य समेलन म्हटले की वाद झालाचं पाहिजे का? असा सवाल करत पवारांनी वाद निर्माण करणाऱ्यांना धारेवर धरलं आहे. पवारांनी अजूनही काही महत्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकला आहे.
स्वागताध्यक्ष छगन भुजबळ म्हणाले की, सभामंडपाला कुसुमाग्रज नगरी नाव देण्याचे अगोदरच ठरले होते. मग त्यांच्या नावाला विरोध का ? स्वातंत्र्यवीर सावरकर हे आमच्यासाठी आदर्श आहेत. संमेलनात त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला तरी देखील आमच्या आदर्शचा अपमान झाला असा विरोध केला गेला. हे अतिशय चुकीचे आहे. कारण नसतांना देखील विरोध केला याचं दुःख आहे. असे सांगत नाशिकची द्राक्ष आंबट नाही त्यात आता शरद सीडलेस तर खूपच गोड आहे. असा टोला त्यांनी लगावला. हे संमेलन अधिक चांगलं करण्याचा प्रयत्न आपण केला. असंही ते म्हणाले आहेत.
साहित्य संमेलनावर बोलताना शरद पवारांनी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष जयंत नारळीकर यांचं कौतुक केले आहे. जयंत नारळीकर या संमेलनाचे अध्यक्ष याचा आनंद आहे. विज्ञानवादाचा या संमेलनाला लवलेख आहे, असं पवार म्हणाले आहेत. गिरीश कुबेर यांच्याबाबत बोलताना त्यांनी कुबेरांवर झालेल्या शाईफेकीचा निषेध नोंदवला आहे. गिरीश कुबेरांवरील शाईफेकीनंतर तीव्र राजकीय प्रतिक्रिया उमटल्याचं दिसून आले.