रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. पतीच्या त्रासाला कंटाळून एका महिलेनं आपल्या सहा मुलांना विहिरीत फेकून दिल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये 6 मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
महाड तालक्यातील ढालकाटी गावात ही घटना घडली आहे. रुना चिखुरी साहनी असं या महिलेचं नाव आहे. एका महिलेनं आपल्या सहा मुलांना विहिरीत फेकून दिले होते. यात एक मुलगी आणि सहा मुलं होती. हे कुटुंब उत्तर प्रदेशमधील राहणारे आहे. या कुटुंबाला एक मुलगा आणि पाच मुली होत्या. पती हा दारूच्या आहारी गेला होता. त्यामुळे तो दारूच्या नशेत पत्नी आणि मुलांना मारहाण करायचा. या त्रासाला पत्नी कंटाळून गेली होती. ढालकाटी गावातील एका शेतात विहीर आहे.
काल संध्याकाळी रागाच्या भरात ही महिला मुलांना घेऊन विहिरीकडे पोहोचली. तिने आधी सहा मुलांना विहिरीत फेकून दिले. त्यानंतर स्वत: विहिरीत उडी मारली. पण, त्याचवेळी तिथून एक आदिवासी जात होता. त्याने तिला पाहिले आणि विहिरीतून बाहेर काढले. तिने जास्त प्रमाणात पाणी प्यायले होते. तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे. तिची प्रकृती आता स्थिर आहे.