ढगाळ वातावरणाने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल

दोन दिवसांपासून पुण्यात होत असलेल्या पाऊस व ढगाळ वातावरणामुळ शेतकरी हवालदिल झाले आहेत. जिल्ह्यातील कांद्याच्या उत्पादनासाठी महत्वाचा तालुका असलेल्या जुन्नरमध्ये ढगाळ वातावरण, अवकाळी पावसाने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ढगाळ वातावरणाने कांदा तरकारी भाजीपाल्यावर विविध रोगाचे संक्रमण होणार आहे कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असल्याने येथील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.

जुन्नर तालुक्यात रोहोकडी, आंबेगव्हान,पाचघर, चिल्हेवाडी, अहिनावेवाडी गावातील अनेक शेतकरी तरकारी पालेभाज्या आणि कांदा पीक घेतात. अचानक हवामानाचा बदल झाल्याने पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झाला त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये पुन्हा अवकाळी पावसाची धास्ती निर्माण झाली आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार दिवसभर अवकाळी पावसाने हजेरी लावली. संथ गतीने बरसणाऱ्या पावसाने रब्बी हंगामासमोर मोठा परिणाम झाला आहे.

ढगाळ हवामान आणि त्यामध्ये घनदाट धुके यामुळे पिकांवर बुरशीजन्य आणि किटकजन्य रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. कांदा पीक हे नाशवंत असले तरी रोजच्या आहारामध्ये गरज असणारे पीक आहे. चालू हंगाम मध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या शेतातील कांदा रोपाला बुरशी होणे, लागवडीनंतर रोप न फुटणे, लागवड केलेला कांदा न उगवणे किंवा जोडणे, हवामानामुळे कांद्याच्या माना लांबने, पावसामुळे कांदा खराब होणे, निष्कृष्ट दर्जाचे कांदा बियाणे आदी वेगवेगळ्या कारणामुळे प्रचंड नुकसान शेतकरी वर्गाला होत आहे. कांदा पिकावर मोठ्या प्रमाणात रोग पडून कांद्याचे पीक खराब होत आहे. खराब झालेले पीक दुरुस्त करण्यासाठी कांदा उत्पादकांना मोठा खर्च करावा लागत आहे. यामुळे येथील कांदा उत्पादक शेतकरी अक्षरश: मेटाकुटीस आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.