जर्मनीतील सुमारे ३.५ दशलक्ष नोकरदारांच्या पगारात वाढ होणार

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने पुन्हा एकदा डोकं वर केलं आहे. दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन सापडला आहे. दोन वर्षानंतर काही गोष्टी सुरळीत होत असतानाच नव्या कोरोनाच्या व्हेरिएंटच संपूर्ण जगावर सावट आहे. अस असताना कर्मचाऱ्यांकरता महत्वाची बातमी आहे.

जर्मनीतील सुमारे ३.५ दशलक्ष राज्यस्तरीय कर्मचारी आणि नोकरदारांच्या पगारात पुढील वर्षी २.८ टक्क्यांनी वाढ होणार आहे. याशिवाय टॅक्सी फ्री कोविड-19 बोनस 1,300 युरो ($ 1,470) म्हणजेच 11 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल.

सोमवारी दोन युनियनने करार जाहीर केला आहे. ज्यामध्ये वैद्यकीय आणि काळजी क्षेत्रातील कामगारांसाठी पगारवाढ जाहीर करण्यात आली आहे. तसेच धोकादायक किंवा कोरोना काळात काम करण्यासाठी वेतन जाहीर केला आहे. प्रशिक्षण आणि इंटर्नसाठी 650 युरो ($735) करमुक्त बोनस देखील प्रदान करेल. वर्डी आणि डीबीबी युनियन यांच्यात एक करार झाला आहे.

जर्मनीतील 16 राज्यांमध्ये विशेषत: आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी संपाची मालिका सुरू केली होती. या संपानंतर ही तरतूद दोन वर्षांसाठी लागू राहणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही वाढ सार्वजनिक रुग्णालये, शाळा, पोलीस, अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि हेसे वगळता सर्व राज्यांतील नोकरशहांना लागू होते, जिथे गेल्या महिन्यात असाच करार झाला होता.

कोरोना विषाणू जगभरात पसरत आहे. त्याच्या नवीन रूप म्हणजे ओमायक्रॉन (Omicron). हा विषाणू प्रथम दक्षिण आफ्रिकेत आढळून आला असून जगभरात झपाट्याने पसरत आहे. आतापर्यंत 16 देशांमध्ये त्याची एंट्री झाली आहे. जीवन सुरळीत होत असताना चिंता वाढली आहे.

डॉक्टरांचे म्हणणे आहे की, हा कोरोना विषाणू पूर्वीच्या डेल्टा प्रकारापेक्षा 7 पट जास्त प्राणघातक आहे. तसेच तो कितीतरी पटीने वेगाने पसरतो. भारताने उच्च जोखीम असलेल्या देशांची यादी तयार केली आहे. जेथून येणाऱ्या लोकांसाठी कठोर नियम लागू होतील. त्यामुळे तुम्हाला ओमायक्रॉन टाळायचा असेल तर ही बातमी जरूर वाचा.

नुकत्याच झालेल्या एका अभ्यासानुसार, कोरोनाचा डेल्टा प्रकार १०० दिवसांत पसरला होता, तो केवळ १५ दिवसांत पसरला आहे. या प्रकारात आतापर्यंत 32 उत्परिवर्तन झाले आहेत. जेव्हा विषाणू झपाट्याने बदलतो म्हणजेच त्याचे स्वरूप बदलतो तेव्हा त्याच्याशी लढणे खूप कठीण होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.