ह्रदयविकार रुग्णाला सत्तेत
राहण्याच्या शुभेच्छा देऊ नका : नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमात जनतेशी संवाद करताना एका ह्रदयविकार रुग्णाला मला सत्तेत राहण्याच्या शुभेच्छा देऊ नका, असं मत व्यक्त केलं. राजेश कुमार प्रजापती या रुग्णाने मोदींचं आयुष्यमान भारत योजनेसाठी कौतुक करताना त्यांना कायम सत्तेत राहण्याच्या शुभेच्छा दिल्या. यावर बोलताना मोदींनी हे मत व्यक्त केलं. यावेळी त्यांनी मी आजही सत्तेत नाही आणि भविष्यातही सत्तेत जायची इच्छा नाही, असंही नमूद केलं.
राज्यात कठोर निर्बंध लागू
सर्वत्र मुखपट्टी परिधान करणे आवश्यकच, मुखपट्टीशिवाय कोठेही फिरता येणार नाही, रुमालाला परवानगी नाही, तोंडाला रुमाल गुंडाळल्यास ५०० रुपये दंड. उपनगरीय रेल्वे, बेस्ट बस, राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बस, मेट्रो, मोनो रेलसह स्थानिक परिवहन सेवांच्या बसमध्ये लसीकरण झालेल्यांनाच मुखपट्टीसह प्रवेश. खासगी बस, गाडय़ा, टॅक्सी, रिक्षा, ओला-उबरमध्ये लसीकरण झालेल्यांनाच प्रवेश. नियमांचे उल्लंघन केल्यास चालक व प्रवाशास ५०० तर वाहनमालकास १० हजार रुपये दंड. दुकाने, मॉल, कार्यालयात येणाऱ्यांनी मुखपट्टीचा वापर केला नसल्यास असे दुकानदार किंवा आस्थापनांना १० हजार रुपये दंड. संबंधित दुकान, मॉल, कार्यालयाला टाळे.
देशवासियांना मोठा दिलासा,त्या दोन कोरोनाबाधितांना ओमिक्राॕनची लागण नाही
दक्षिण आफ्रिकेने कोरोनाचा नवा व्हेरिअंट जगासमोर आणला आणि त्या देशाने काहीतरी पाप केल्यासारखे अन्य देश वागू लागले आहेत. दक्षिण आफ्रिकेवर निर्बंध लागू झाले आहेत.अशावेळी आफ्रिकेहून आलेल्या दोन प्रवाशांना कोरोना असल्याचे समोर आल्याने भारतात हडकंप उडाला होता.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला हिंसक वळण
गाडय़ांवर दगडफेकीच्या घटना
विलीनीकरणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला हिंसक वळण लागले आहे. विलीनीकरणाचा मुद्दा मार्गी लागत नसल्याने तसेच राज्यात काही भागांत सुरू होत असलेल्या एसटी आणि महामंडळाने कारवाईत केलेली वाढ याला काही भागांतून विरोधही वाढू लागला आहे. त्यामुळे शनिवारी ११ हून अधिक एसटी गाडय़ांवर दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. यात चालक, वाहकही जखमी झाले आहेत. दगडफेक करणाऱ्या अज्ञात व्यक्तींच्या विरोधात एसटी महामंडळाच्या वतीने स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, महामंडळाने निलंबनाची कारवाईही अधिक तीव्र केली असून शनिवारी ३ हजार १० कर्मचारी निलंबित केल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली.
दिेंडीत टेम्पो शिरून चार
महिला वारकऱ्यांचा मृत्यू
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर साते गावाजवळ शनिवारी सकाळी आळंदीला निघालेल्या पायी दिेंडीत टेम्पो शिरून चार महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघातात २४ वारकरी जखमी झाले असून दिंडीत सहभागी झालेले वारकरी रायगड जिल्ह्यातील कर्जत, खालापूर, उंबरे परिसरातील आहेत. जखमी वारकऱ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जोपर्यंत विलीनीकरण होत नाही,
तोपर्यंत संप सुरूच राहणार
जोपर्यंत एसटीचं विलीनीकरण होत नाही. तोपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच राहणार आहे. डंके चोटपर आमचा लढा सुरूच राहील, असं अॕड. गुणरत्न सदावर्ते यांनी आज स्पष्ट केलं. ते आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांना संबोधित करत होते. गुणरत्न सदावर्ते यांनी आज दिवसभर एसटी कामगार संघटनेच्या नेत्यांशी चर्चा केली. कर्मचाऱ्यांशीही संवाद साधला. त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. आम्ही उघड्या आकाशाखाली बसलो आहोत. आम्ही कष्टकऱ्यांचा लढा सुरूच ठेवणार आहोत. डंके की चोटपर आमचा लढा सुरूच राहील. आम्ही माघार घेणार नाही. विलीनीकरणाच्या मागणीवर आम्ही ठाम आहोत, असं सदावर्ते यांनी सांगितलं.
पहिल्या सत्रात भारताचा
अर्धा संघ तंबूत परतला
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना कानपूरच्या ग्रीनपार्क स्टेडियमवर खेळला जात आहे. आज या कसोटीचा चौथा दिवस असून सामना रंजक स्थितीत आहे. भारताने १ बाद १४ धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली आहे. तिसऱ्या दिवसअखेर न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काईल जेमीसनने शुबमन गिलचा त्रिफळा उद्ध्वस्त केला. आज पहिल्या सत्रात आपले चार फलंदाज अजून गमावल्यामुळे भारताचा अर्धा संघ तंबूत परतला आहे. लंचपर्यंत श्रेयस अय्यर आणि रवीचंद्रन अश्विन नाबाद असून भारताने ५ बाद ८४ धावा केल्या आहेत. भारताकडे १३३ धावांची आघाडी आहे.
SD social media
9850 60 3590