नुकतीच कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटन धास्ती वाढवली असताना कर्नाटकातून एक खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. कर्नाटकमधील धारवाढ येथे एकाच कॉलेजमधील 281 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. एसडीएम मेडीकल कॉलेजमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यामुळे परिसरात भितीचं वातावरण पसरलंय.
यातील केवळ 6 रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणं आढळून आली असली, इतरांना लक्षणं नसली तरी अचानक झालेल्या वाढीनं खळबळ उडवून दिली आहे. कोरोना झालेल्यामध्ये विद्यार्थी शिक्षक कर्मचारी असा सर्वांचा समावेश आहे. शुक्रवारी एका दिवसात 99 कोरोना रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे आरोग्य विभागाची झोड उडाली आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळला असतानाच अचानक एवढी रुग्णवाढ म्हणजे दुष्काळात 13वा महिना आल्यासरखे आहे.
काही दिवसाआधीच कॉलेजमध्ये एक सांस्कृतिक कार्यक्रम झाल्याची माहिती समोर आल्याचं कर्नाटकच्या आरोग्यमंत्र्यांकडून सांगण्यात आलंय. सांस्कृतिक कार्यक्रमात गर्दी केल्यानेच ही रुग्णवाढ झाल्याचा अंदाज कर्नाटक सरकारकडून व्यक्त करण्यात आलाय. स्थानिक आरोग्य विभागापासून ते कर्नाटकचे आरोग्यमंत्री, मुख्यमंत्रीही याप्रकरणी लक्ष देत आहेत. पण या रुग्णवाढीमुळे राज्यात कोणतीही निर्बंध लावणार नसल्याचं कर्नाटक सरकारकडून सांगण्यात आलंय. याबाबत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलवत परिस्थितीचा आढावा घेतला आहे.
स्थानिक प्रशासनानं ताडतडीनं अजूनबाजूचा परिसर सॅनिटायझेशन करून घेतला आहे. तसेच अजूबाजूच्या शाळा आणि महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रशासन आता खडबडून कामाला लागलं आहे. केरळमध्ये पुन्हा मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे कर्नाटकमधील रुग्णवाढ भविष्यात महाराष्ट्राची डोकेदुखी वाढवणार का? हेही पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.