अभिनेत्री शिल्पा शिरोडकर (Shilpa Shirodkar) ही 90च्या दशकातील बोल्ड अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. 20 नोव्हेंबर 1969 रोजी जन्मलेल्या शिल्पाने वयाच्या अवघ्या 20व्या वर्षी तिच्या करिअरला सुरुवात केली. शिल्पाला अभिनयाचा वारसा कुटुंबातूनच मिळाला आहे. तिची आई गंगूबाई या मराठी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या, तर आजी मीनाक्षी शिरोडकर देखील अभिनेत्री होत्या.
1989 मध्ये ‘भ्रष्टाचार’ या चित्रपटातून शिल्पाने तिच्या करिअरला सुरुवात केली. यात तिच्या सोबत अभिनेता मिथुन चक्रवर्ती होते. 1990 मध्ये आलेल्या ‘किशन कन्हैया’ या चित्रपटातून शिल्पाला खरी ओळख मिळाली. चित्रपटात बोल्ड सीन्स देऊन शिल्पाने बॉलिवूडमध्ये खळबळ माजवली होती. चित्रपटातील एक ‘राधा बिना’मध्ये तिने पारदर्शक साडी नेसली होती. या चित्रपटात तिच्या सोबत अनिल कपूर मुख्य भूमिकेत होता.
यानंतर शिल्पाने तिच्या 10 वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये अमिताभ बच्चन, गोविंदा, अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि मिथुन चक्रवर्ती यांच्यासोबत काम केले. शिल्पाचे अनेक चित्रपट काही विशेष जादू दाखवू शकले नाहीत. फ्लॉप चित्रपटांमुळे शिल्पाचे करिअरही उंचीवर पोहोचले नाही.
आपल्या करिअरची प्रगती पाहून शिल्पाने 2000 मध्ये यूके स्थित बँकर अपरेश रणजीतशी लग्न केले. लग्नानंतर शिल्पा लंडनमध्ये राहू लागली. शिल्पाला एक मुलगी आहे. शिल्पाच्या लग्नानंतर तिची बहीण नम्रता शिरोडकर हिने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला.
शिल्पाचे मन अभ्यासात कधीच रमले नाही. एका मुलाखतीत ती म्हणाली होती की, ‘मी 10वी नापास झाले आहे, पण मला त्याबद्दल कोणतीही खंत किंवा लाज वाटत नाही. मी सुरुवातीपासूनच अभ्यासात खूप कमकुवत होते, त्यामुळे ती अभिनय क्षेत्रात आली हे चांगलेच झाले. मात्र, परदेशात राहत असताना मला असे वाटले की माझे शिक्षण झाले असते, तर मी तिथे नोकरी करू शकले असते.’
शिल्पाने मिथुन चक्रवर्ती यांच्यासोबत सर्वाधिक चित्रपट केले आहेत. यामध्ये ‘हिटलर’, ‘भ्रष्टाचार’, ‘अपने दम पार’, ‘रंगबाज’, ‘जीवन की शतरंज’, ‘त्रिनेत्र’, ‘स्वर्ग यहां नर्क यहां’ आणि ‘पाप की कमाई’ यांचा समावेश आहे. शिल्पाच्या हिट चित्रपटांमध्ये हम (1991), दिल ही तो है (1992), आँखे (1993), खुदा गवाह (1993), गोपी-किशन (1993), हम हैं बेमिसाल (1994), बेवफा सनम (1995), मृत्युदंड (1995) आणि दंडनायक (1998) यांचा समावेश आहे.