कोरोनामुळं शहरातील मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. वाढत्या मृत्यूच्या प्रमाणामुळं महानगरपालिकेनं आता ‘ऑनलाईन अंत्यविधी पास’ ची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. मृत रुग्णांच्या नातेवाईकांना अंत्यविधी पाससाठी ताटकळत राहावं लागू नये. जलद गतीनं पासची उपलब्धता व्हावी,यासाठी ही सुविधा निर्माण केली आहे. कोरोना काळात नागरिकांना ऑनलाईन अंत्यविधी पासची सुविधा उपलब्ध करून दिली होती. मात्र यापुढं ही सुविधा कायम करण्याचा निर्णय महानगरपालिकेनं घेतला आहे.
”मृत्यूचा दाखल व अंत्यविधीचे पासेस ऑनलाईन देत महापालिकेच्या यंत्रणेमध्ये आणखी सुटसुटीतपणा आणण्यासाठी ही सुविधा निर्माण केल्याची माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी दिली आहे.”
जन्म-मृत्यूचे दाखले मिळतात ऑनलाईन
महानगरपालिकेने यापूर्वी नागरिकांच्या सोयीसाठी जन्म – मृत्यूचे दाखले ऑनलाईन देण्याची सुविधा निर्माण केली आहे. त्यानंतर आता ‘अंत्यविधीसाठी ऑनलाईन पास’ ची सुविधा कायम स्वरूपी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं रुग्णाच्या मृत्यूनंतर रुग्णाच्या नातेवाईकाला आता महापालिकेच्या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करत ऑनलाईन पास मिळवता येणार आहे. संकेतस्थळावरून काढलेला पास स्मशान भूमीतील अधिकृत कर्मचाऱ्याला दाखवा लागेल. त्यांनंतर संबंधित कर्मचारी त्याची संकेतस्थळावर खातरजमा करेल व अंत्यविधीस परवानगी देईल. यासुविधेमुळं रुग्णांच्या नातेवाईकांची रात्री अपरात्री होणारी धावपळ थांबणार आहे.
सद्यस्थितीला महानगरपालिका , पालिका रुग्णालये व क्षेत्रीय कार्यालयातून अंत्यविधीचे पास उपलब्ध करून दिले जातात. त्यानंतर याच्या नोंदी कसबा पेठीतील जन्म -मृत्यू कार्यालयाकडे जातात. यासगळ्यासाठी साधारण 21दिवसांचा कालावधी लागतो. अनेकदा रुग्णाचा रात्री मृत्यू झाला तर नातेवाईकांना अंत्यविधी पासेससाठी रात्रीच्या वेळी महापालिका कार्यालय, क्षेत्रीय कार्यालयात खेटे मारावे लागतात. याबरोबर मृत व्यक्तींच्या आधारकार्ड, ओळखपत्राच्या झेरॉक्स मागितल्या जातात. रात्रीची वेळ असेल तर झरॉक्स मिळणे अवघड होऊन जाते व नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागतो. प्रक्रियेमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे .
शहरात ठिकठिकाणी स्मशानभूमी व दफन भूमीची सुविधा आहे. शहरातीला सर्वात मोठ्या वैकुंठ स्मशानभूमीत लवकरच सार्वाजनिक स्वच्छता व सुरक्षेच्या संदर्भात महत्त्वाची पावले उचलली जाणार आहे , इतर ठिकाणच्या स्मशानभूमी व दफनभूमीची पाहणी करत, आवश्यकती डागडुजी केली जाणार असल्याची माहितीहीअतिरिक्त आयुक्त डॉ. खेमनार यांनी दिली आहे.