टी20 विश्वचषक (ICC T20 World Cup) आता अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला आहे. आज अर्थात 14 नोव्हेंबर रोजी अंतिम सामना खेळवला जाणार आहे. संपूर्ण विश्वचषकात उत्तम कामगिरी करत न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया हे संघ फायनलपर्यंत पोहोचले आहेत. पहिल्या सेमीफायनल सामन्यात न्यूझीलंड संघाने इंग्लंडला मात देत अंतिम सामन्यात जागा मिळवली ज्यानंतर पाकिस्तानला मात देत ऑस्ट्रेलियाचा संघ अंतिम सामन्यात पोहोचला आहे. आता हे दोघे एकमेंकाविरुद्ध भिडणार आहेत. वेगवेगळ्या ग्रुपमधून आलेले हे संघ यंदाच्या विश्वचषकात प्रथमच आमने-सामने येणार असून कोण यंदाची ट्रॉफी उचलेल, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
टी – 20 विश्वचषकातील अंतिम सामना उद्या अर्थात रविवारी (14 नोव्हेंबर) न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी खेळवला जाईल. नाणेफेक 7 वाजता होणार आहे.
न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा टी -20 विश्वचषकाचा अंतिम सामना दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर खेळवला जाणार आहे.
विश्वचषकाचा अंतिम सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर (स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 2 आणि स्टार स्पोर्ट्स 3) हिंदी आणि इंग्रजी भाषेत थेट प्रसारित केला जाईल.
या सामन्याचे ऑनलाइन लाइव्ह स्ट्रीमिंग डिस्ने+ हॉटस्टारवर ऑनलाइन पाहू शकता
सामन्यासाठी संभाव्य संघ
संभाव्य न्यूझीलंड संघ: केन विल्यमसन (कर्णधार), डॅरील मिचेल, मार्टीन गप्टील, जेम्स निशम, डेवॉन कॉन्वे, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, इश सोढी, टीम साऊदी, ट्रेन्ट बोल्ट, अॅडम मिल्ने.
संभाव्य ऑस्ट्रेलिया संघ: डेव्हिड वॉर्नर, आरॉन फिंच (कर्णधार), मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, स्टीव्ह स्मिथ, मार्कस स्टॉयनिस, मॅथ्यू वॅड, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्च, अॅडम झाम्पा, जोश हॅजलवुड.