आपल्या तुफानी फलंदाजीने गोलंदाजांना गारद करणारा वेस्ट इंडिजचा फलंदाज ख्रिस गेल क्रिकेटमधून संन्यास घेणार आहे का ? असे विचारले जात आहे. कारण ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यात झालेल्या टी20 सामन्यात ख्रिस गेलने असं काही केलं आहे की, ज्यामळे हा प्रश्न उपस्थित केला जातोय. सोशल मीडियावर तर गेल खरंच संन्यास घेणार असल्याचं म्हटलं जात आहे.
15 धावा केल्या, हवेत बॅट फिरवली
ख्रिस गेलने क्रिकेटमधून सन्यास घेतला आहे का असे विचारले जात आहे. मात्र तशी कोणतीही घोषणा ख्रिस गेलने अद्यापतरी केलेली नाही. असे असले तरी आज ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात झालेल्या सामन्यात बाद झाल्यानंतर ख्रिस गेलने जे केलं त्यावरून तो निवृत्त झाल्याचं म्हटलं जात आहे. ख्रिस गेलने ऑस्ट्रेलियावरुद्धच्या सामन्यात 15 धावा केल्या. या पूर्ण खेळीमध्ये गेलने दोन षटकार लगावले. शेवटी पवेलियनमध्ये परतताना त्याने आपली बॅट आणि हेल्मेट हवेत वर केले.
गेलने दिलं आलिंगन, बाकीच्या खेळाडूंकडून ट्रिब्यूट
गेलने त्याच्या चाहत्यांकडे पाहून अभिवादन केले. विशेष म्हणजे परतत असताना तो अत्यंत शांतपणे येत होता. त्याचे हे हावभाव पाहून तो वेस्ट इंडिजच्या जर्सीमध्ये शेटचा सामना खेळत आहे, असेच त्याच्या चाहत्यांना वाटले. गेल मैदानातून परतत असताना वेस्ट इंडिजच्या इतर खेळाडूंनी त्याला ट्रिब्यूट दिलं. गेलने इतर खेळाडूंना देलेल्या आलिंगनाचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.