अमेरिकेच्याYahoo Inc (Yahoo) कंपनीने चीनमधून गाशा गुंडाळण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने मंगळवारी यासंदर्भात घोषणा केली. चीनमध्ये व्यावसायिक आणि कायदेशीर आव्हाने वाढत असल्याने हा निर्णय घेत असल्याचे ‘याहू’ने सांगितले. चिनी अधिकारी देशात इंटरनेट सेन्सॉरशिपची कडक अंमलबजावणी करतात. चीनमध्ये कार्यरत कंपन्यांनी राजकीयदृष्ट्या संवेदनशील आणि अयोग्य सामग्री आणि शब्द अवरोधित करणे अपेक्षित आहे. त्यामुळे सोशल मीडियासह अनेक माध्यमांची कोंडी झाली आहे.
चीनमधील वाढता व्यवसाय आणि कायदेशीर आव्हानांमुळे, चीनच्या मुख्य भूभागावर याहूच्या सर्व सेवा यापुढे 1 नोव्हेंबरपासून उपलब्ध होणार नाहीत, असे याहू कंपनीने अधिकृत निवेदनात म्हटले आहे. चीनमधील वापरकर्त्यांना प्रदान केलेल्या सेवा 1 नोव्हेंबरपासून थांबवण्यात आल्या आहेत. चीनच्या स्थानिक माध्यमांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आम्ही वापरकर्त्यांच्या हक्कांसाठी आणि विनामूल्य आणि मुक्त इंटरनेटसाठी वचनबद्ध आहोत, असेही ‘याहू’कडून सांगण्यात आले.
चीनमधील कायद्यानुसार देशात कार्यरत कंपन्यांनी अधिकार्यांना मागणीनुसार डेटा प्रदान करणे आवश्यक आहे. ज्यामुळे पाश्चात्य कंपन्यांना तेथे काम करणे कठीण होते. या कंपन्यांवर सरकारचा दबाव असतो. अलीकडच्या आठवड्यात चीनमध्ये आपले कामकाज कमी करणारी Yahoo ही दुसरी मोठी अमेरिकी तंत्रज्ञान कंपनी आहे. गेल्या महिन्यात, मायक्रोसॉफ्टच्या व्यावसायिक नेटवर्किंग प्लॅटफॉर्म ‘लिंक्डइन’नेही चीनमधून काढता पाय घेतला होता.
भारतात लोकं बॉयकॉट चीनचा नारा देत आहेत, तर चायनीज कंपन्या भारतात सलग मोबाईल विकण्याचे नवीन रेकॉर्ड करत आहेत (Chinese Company sell in india). सरकार ते सामान्य माणूस बॉयकॉट चीनचा नारा देत आहे. पण त्याचा भारतात किती फरक पडला हे चीनी कंपनीच्या विक्रीवरुन स्पष्ट झाले आहे. 2018 मध्ये एमआयने (Mi India) भारतात 50 लाखांपेक्षा अधिक स्मार्ट टीव्हीची विक्री केली आहे, असं एमआयने सांगितले.