चीनने घेतली हायपरसोनिक मिसाईलची चाचणी, अंतराळातून कुठेही अणवस्त्र डागू शकतो

भारताचा प्रमुख शत्रू चीननं सगळ्या जगाचं टेन्शन वाढवणारं काम केलं आहे. चीननं जगातील सर्वात मोठी भयानक स्पर्धा सुरु केली आहे. चीननं अंतराळातून जमीनीवर अणवस्त्र डागण्याची चाचणी केली आहे. चीननं त्यांच्या लाँग मार्च रॉकेटच्या मदतीनं हायपरसोनिक मिसाईल अंतराळातून जमिनीवर सोडली. मिसाईलनं पृथ्वीला प्रदक्षिणा घातली त्यानंतर ती मिसाईल दिलेल्या टार्गेटवर डागण्यात आली. संरक्षण क्षेत्रातील जाणकारांच्या मते आता अंतराळातून चीन जमिनीवर कुठेही अणवस्त्र डागू शकतो यामुळं जगाचं टेन्शन वाढलंय.

अमेरिकेतील संरक्षण विषयक प्रसिद्ध वेबसाईट द ड्राईव्हच्या रिपोर्टनुसार चीनची ही यंत्रणा यशस्वी झाली तर संपूर्ण जगावर दूरगामी परिणाम होऊ शकतात. चीनच्या या कारनाम्याची अमेरिकन अधिकाऱ्यांना माहिती मिळाली तेव्हा त्यांना धक्का बसला. चीनची मिसाईल दिलेल्या टार्गेटपासून 32 किमीवर पडली असली तरी अमेरिकेला पुढील धोका समजला आहे.

द ड्राईव्हच्या वृत्तानुसार चीनची हायपरसोनिक मिसाईल डागण्याची क्षमता चिंता वाढवणारी ठरलीय. चीनचं हायपरसोनिक मिसाईल जगातील ताकदवर देशांच्या मिसाईल डिफेन्स सिस्टीमला भेदू शकते. मिसाईल डिटेक्शन सिस्टीम देखील यापूढे निकामी ठरणार आहेत.हायपरसोनिक मिसाईलमुळं पारंपारिक एअर डिफेन्स सिस्टीम उध्वस्त होऊ शकतात. जगात आता कोणत्याही देशाकडं चीनच्या हायपरसोनिक मिसाईलला रोखण्याची क्षमता नाही. हायपरसोनिक मिसाईलला ब्रह्मास्त्राची संज्ञा दिली जाते. मात्र, रशियानं हायपरसोनिक मिसाईलला रोखण्याची आमची क्षमता असल्याचं म्हटलं आहे. त्यांची एस-500 ही एअर डिफेन्स सिस्टीम हायपरसोनिक मिसाईल पाडू शकते, असं रशिया म्हणतेय.चीनचं मिसाईल हजारो कि.मी.चा प्रवास करुन हल्ला करु शकते.

चीनच्या हायपरसोनिक मिसाईलच्या क्षमतेमुळं अमेरिकेचं टेन्शन वाढलं आहे, अंतराळातून येणाऱ्या आणि ध्वनीच्या 5 पट अधिक वेग असल्यामुळे हायपरसोनिक मिसाईलला अमेरिकेचं रडार देखील ट्रॅक करु शकत नाही. या मिसाईल त्यांच्या मार्गात नष्ट करणं अशक्य आहे. अमेरिकेच्या एअर फोर्स प्रमुखांनी गेल्या महिन्यात या धोक्याबद्दल इशारा दिला होता.

उत्तर कोरिया, रशिया आणि अमेरिका देखील हायपरसोनिक मिसाईलच्या निर्मिमतीसाठी प्रयत्न करत आहे. या देशांपूर्वीचं चीननं हायपरसोनिक मिसाईल विकसित करुन जगाचं टेन्शन वाढवलं आहे. चीनचं हायपरसोनिक मिसाईल जगातील इतर देशांसह भारताचं टेन्शन वाढवणार ठरलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.