CBSE बोर्ड इयत्ता दहावी आणि बारावीची परीक्षा ऑफलाईन होणार

विद्यार्थी आणि पालकांसाठी आता मोठी बातमी आहे. CBSE विद्यार्थ्यांची इयत्ता दहावी आणि बारावीची परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. ही परीक्षा दोन सत्रामध्ये होणार आहे. यासोबतच परीक्षेच्या पॅटर्नमध्ये देखील बदल करण्यात आला आहे. दहवी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना हा बदल माहीत असणं आवश्यक आहे. नाहीतर मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षी कोरोनामुळे अनेक बोर्डाने आपल्या परीक्षा रद्द केल्या होत्या. यंदा मात्र CBSE बोर्डने दहावी आणि बारावीची परीक्षा 2 सत्रात ऑफलाइन घेण्याचा निर्णय घेतला आहे. इतकच नाही तर सब्जेक्टीव्ह प्रश्न नसतील. पूर्ण पेपर हा ऑबजेक्टिव्ह असणार आहे. विद्यार्थ्यांना पेपर 90 मिनिटांत द्यायचा आहे. परीक्षेच्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील अशी माहिती मिळाली आहे.

CBSE ने दिलेल्या माहितीनुसार, इयत्ता 10 वी आणि 12 वी च्या पहिल्या टप्प्यातील बोर्ड परीक्षा ऑफलाइन घेण्यात येतील. परीक्षेची तारीख 18 ऑक्टोबर रोजी जाहीर केली जाईल. 10 वी आणि 12 वीच्या पहिल्या टर्म -1 बोर्ड परीक्षेत वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जातील, त्यासाठी 90 मिनिटे दिली जातील.

CBSE सध्या पहिल्या टप्प्यातील परीक्षांची डेटशीट तयार करत आहे. जी लवकरच जाहीर केली जाईल. कोरोनाची परिस्थिती आणि विद्यार्थ्यांना सोयीचं होईल अशी सर्व परिस्थिती पाहून वेळापत्रक तयार करण्यात येईल असं सांगितलं जात आहे. प्रथम टर्म बोर्डाच्या परीक्षा 8 आठवड्यांच्या दीर्घ वेळापत्रकात घेता येतात. लवकरच सीबीएसई बोर्ड पहिल्या टर्म बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करणार आहे.

परीक्षा जशी दोन सत्रात होणार तसंच प्रॅक्टिकल परीक्षाही दोन सत्रात होणार आहे. 10 नोव्हेंबरपर्यंत मार्किंग स्कीम देखील शिक्षकांपर्यंत पोहोचणार आहे. बारावीसाठी 30 मार्कांचं प्रॅक्टिल असणार आहे. पहिल्या सत्रात 15 आणि दुसऱ्या सत्रात 15 मार्क अशी विभागणी करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.