करोनाचा धोका पुन्हा एकदा वाढला आहे. पुन्हा लॉकडाउन करणं एक मार्ग आहे. लॉकडाउनचा पर्याय समोर दिसत आहे. मात्र मला अजूनही लोकांकडून सहकार्याची अपेक्षा आहे.” असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.
राज्यात करोना रुग्णसंख्या वाढत असून ठाकरे सरकारची चिंता वाढू लागली आहे. राज्यात २४ तासांत तब्बल २५ हजार ८३३ लोकांना करोनाची लागण झाली असून ५८ जणांचा मृत्यू झाला. ते नंदुबारमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पुढे ते म्हणाले की, “परदेशी स्ट्रेन आपल्याकडे आला आहे, त्याचे आकडेही नियंत्रणात आले होते.
खासगी रुग्णालयांना लसीकरणासाठी मान्यता
राज्यातील १३४ खासगी रुग्णालयांना केंद्राने लसीकरणासाठी मान्यता दिल्याची माहिती राज्य सरकारने दिली. लसीकरणाचा वेग वाढवण्याचे आव्हान आपल्यासमोर असून, तीन-चार महिन्यांत प्राधान्य गटातील सर्वांच्या लसीकरणाची प्रक्रिया पूर्ण करा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासानाला दिले. राज्यातील करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने कठोर निर्बंध लागू करण्याचे आदेशही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. मुख्यमंत्र्यांनी दूरचित्रसंवाद यंत्रणेच्या माध्यमातून विभागीय आयुक्तांशी संवाद साधत लसीकरणाचा आढावा घेतला.