इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाने ICSI CS फाउंडेशन परीक्षा 2021 च्या तारखा जाहीर केल्या आहेत. डिसेंबर टर्मची परीक्षा 3 आणि 4 जानेवारी 2022 रोजी होणार आहे. जे उमेदवार परीक्षेला बसणार आहेत ते ICSI च्या अधिकृत वेबसाईट icsi.edu ला भेट देऊन नोटीस तपासू शकतात. संस्थेने डिसेंबर 2021 सत्रापासून रिमोट प्रोक्टोरिंगद्वारे फाउंडेशन प्रोग्राम साठी संगणक आधारित परीक्षा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही दिवसांच्या परीक्षा चार शिफ्टमध्ये घेण्यात येतील – पहिली शिफ्ट सकाळी 9.30 ते 11, दुसरी शिफ्ट दुपारी 12 ते 1.30, तिसरी शिफ्ट दुपारी 2.30 ते दुपारी 4 आणि चौथी शिफ्ट संध्याकाळी 5 ते संध्याकाळी 6.30 पर्यंत. पेपर 1 आणि पेपर 2 पहिल्या दिवशी आणि पेपर 3 आणि पेपर 4 दुसऱ्या दिवशी घेण्यात येतील.
सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट icsi.edu वर डाउनलोड करा.
इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाने ICSI CS निकाल 2021 तारीख जाहीर केली आहे. व्यावसायिक, कार्यकारी आणि फाउंडेशन प्रोग्रामचा निकाल 13 ऑक्टोबर 2021 रोजी एकाच वेळी जाहीर केला जाईल. तिन्ही अभ्यासक्रमांचा निकाल ICSI च्या अधिकृत वेबसाईट icsi.edu वर जाहीर केला जाईल. उमेदवार केवळ या वेबसाईटला भेट देऊन परीक्षेचा निकाल तपासू शकतात. संस्थेने जारी केलेल्या नोटीसनुसार, व्यावसायिक अभ्यासक्रमाचा निकाल सकाळी 11 वाजता जाहीर केला जाईल. त्याचबरोबर कार्यकारी अभ्यासक्रमाचा निकाल दुपारी 2 वाजता आणि फाउंडेशन अभ्यासक्रमाचा निकाल दुपारी 4 वाजता जाहीर होईल.
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 साठी 100 पदं वाढवली
तर दुसरीकडे महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 साठी आमखी 100 जागा वाढवल्या आहेत. या जाहिरातीप्रमाणे एकूण 290 पदांसाठी 16 संवर्गात भरती होणार होती. मात्र, आता ही पदसंख्या वाढवण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. आयोगाने थेट 100 पदं वाढवली आहेत. त्यामुळे आता 390 पदांसाठी 2 जानेवारी 2022 ला एमपीएससीकडून राज्य सेवा पूर्व परीक्षा आयोजित केली जाईल. पदांच्या संख्येत वाढ झाल्यानं विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्यासाठी आज एमपीएससीनं नवीन परिपत्रक जारी केलंय. यामध्ये एकूण 20 संवर्गात 390 पदांची जाहिरात करण्यात आली आहे. क्लास 1 ( गट अ च्या ) 100 जागा वाढल्याने उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.