आर्यन खानचे समर्थन करणार्‍या ह्रतिक वर कंगना भडकली

बॉलिवूडचा किंग खान म्हणजे अभिनेता शाहरूख खान सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. त्याचा मुलगा आर्यन खान ड्रग्स प्रकरणामुळे एनसीबीच्या कोठडीत आहे. क्रुझवर टाकलेल्या धाडीत सुरू असलेल्या रेव्ह पार्टीतून आर्यनसोबत आठ जणांना एनसीबीने ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणी काय निकाल लागतो हे येणारा काळचं ठरवेल. पण सध्या सोशल मीडियावर सर्वत्र आर्यनची चर्चा आहे. मोठे स्टार देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून आर्यनचं समर्थन करत आहे.

दरम्यान, अभिनेता ह्रतिक रोशनने आर्यनचं समर्थन केलं. पण त्यानंतर अभिनेत्री कंगना रानौत मात्र भडकली आणि ह्रतिकवर टीका केली. कंगना म्हणाली, ‘सध्या सर्व माफिया पप्पू आर्यन खानचं समर्थन करत आहे. आपण चुका करतो याचा अर्थ असा होत नाही की आपण त्याला गर्वाने सांगतो मला आशा आहे की… या वाक्याने त्याला एक वेगळी दिशा मिळेल…’

कंगना पुढे म्हणाली, ‘त्याला त्याच्या कृत्याची जाणीव होईल. जी कारवाई त्याच्यावर होईल त्यामुळे त्याला एक चांगला धडा मिळेल. त्यानंतर तो एक चांगला व्यक्ती म्हणून त्या जाळ्यातून बाहेर येईल.. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीबद्दल चर्चा करत नाही, कारण त्यांना आधीच वाईट वाटत असतं. ज्यामुळे वाईट परिस्थिती निर्माण होते…’

‘मी समजू शकतो तुला वाईट वाटत असेल. राग, गोंधळ आणि असहायता, या सर्व गोष्टी तुझ्यातला एक अभिनेता बाहेर आणण्यासाठी आवश्यक आहे. लक्षात ठेवं या सर्व गोष्टी तुझ्यातील चांगल्या गोष्टी देखील जाळून टाकतील. एका मर्यादेपर्यंत चुका, विजय, यश हे सर्व सारखेच आहे. तुला काय करायचे आहे ते समजून घे आणि कोणत्या गोष्टीकेड दुर्लक्ष करायचं आहे याकडे लक्ष दे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.