अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसोबतच्या पहिल्या द्विपक्षीय बैठकीचा भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी व्हाईट हाऊसमध्ये जो बायडन यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांनी कोविड -19 आणि हवामान बदल, व्यापार आणि इंडो-पॅसिफिकसह अनेक प्राधान्य मुद्द्यांवर चर्चा केली. या बैठकीबद्दल माहिती देताना भारताचे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या अमेरिकेच्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांची घेतली. पदभार स्वीकारल्यानंतर पंतप्रधान जो बायडन यांच्यासोबत पंतप्रधान मोदींची ही पहिली भेट होती.
या भेटीवेळी जो बायडन यांनी कोविडच्या दुसऱ्या लाटेदरम्यान भारत सरकारने घेतलेल्या निर्णयांचे कौतुक केले. त्यांनी लसीची निर्यात पुन्हा सुरू करण्याच्या भारत सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले. याशिवाय भारत-अमेरिका संरक्षण संबंधांवर चर्चा झाली. दोन्ही देशांनी संरक्षण क्षेत्रात नवीन उच्च तंत्रज्ञान प्रकल्पांवर एकत्र काम करण्याची इच्छा व्यक्त केली.
या भेटीदरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व मिळायला हवं, असे मत व्यक्त केले. तसे भारत आणि अमेरिकेने दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. यावेळी मोदी आणि बायडन यांच्यात अफगाणिस्तानमधील परिस्थितीसंदर्भातही चर्चा झाली. या भेटीनंतर आता पंतप्रधान मोदी न्यूयॉर्कला रवाना होतील. याठिकाणी ते संयुक्त राष्ट्रांच्या 76व्या आमसभेला संबोधित करतील.
2014 मध्ये पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पंतप्रधान मोदींनी 7 व्या वेळी अमेरिकेला भेट दिली आहे. ते म्हणाले होते की त्यांचा हा दौरा भारत-अमेरिका व्यापक वैश्विक धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यासाठी आणि राष्ट्रपती बायडेन यांच्याशी परस्पर हितसंबंधांच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्यांवर विचारांची देवाणघेवाण करण्याची संधी असेल. भारत-अमेरिका द्विपक्षीय शिखर परिषदेच्या अगोदर, एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले होते की, या मुद्द्यांमध्ये सहकार्याच्या नवीन क्षेत्रांविषयी चर्चा देखील समाविष्ट आहे.
या भेटीदरम्यान राष्ट्रपती जो बायडेन यांनी पुढील आठवड्यात येणारी गांधी जयंत साजरी करण्यात येणार असल्याची माहिती दिली. पुढील आठवड्यात आम्ही गांधी जयंती साजरी करणार आहोत. गांधीजींचा अहिंसेचा संदेश आज पहिल्यापेक्षा अधिक पटीने महत्वाचा आहे, असं बायडन म्हणाले.