आयपीएल मध्ये चेन्नईची मुंबईवर मात

आयपीएल 2021 (IPL 2021) मधील दुसऱ्या सत्राची सुरुवात रविवारपासून झाली. या सत्रातील पहिला सामना मुंबई आणि चेन्नई या दोन्ही संघांमध्ये खेळला गेला. आयपीएलच्या या 30 व्या सामन्यामध्ये मुंबईच्या संघाला चेन्नईनं 20 धावांनी हरवलं. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या चेन्नईच्या संघानं मुंबईसमोर 6 गडी बाद 156 धावा केल्या.

चेन्नईनं दिलेलं लक्ष गाठण्यासाठी मैदानात आलेल्या मुंबईच्या संघानं 8 गडी बाद 136 धावा केल्या. ज्यामुळं माहिच्या चेन्नईला सामन्याचं जेतेपद मिळालं. सामन्यामध्य़े अनेक क्षण क्रीडारसिकांच्या मनाचा ठाव घेऊन गेले. धोनीची चाणाक्ष बुद्धी आणि खेळावर असणारी पकड पाहता त्यानं या सामन्यातही पुन्हा सिद्ध केलं की, डिसीजन रिव्यू सिस्टम (DRS) चा मास्टर म्हणून त्याचा उल्लेख का केला जातो.

मुंबईचा संघ फलंदाजीसाठी आला असताना तिसऱ्याच षटकात पहिल्या चेंडूवर दीपक चाहरच्या गोलंदाजीवर क्विंटन डिकॉक गटांगळ्या खाताना दिसला. चेंडू थेट त्याच्या पॅडला लागला. पण, ऑनफिल्ड अंपायरनं त्याला नाबाद घोषित केलं. त्याचवेळी माहीनं लगेचच या निर्णयासाठी रिव्ह्यूचं अपिल केलं. ज्यानंतर थर्ड अंपायरनं डिकॉकला बाद घोषित केलं आणि पुन्हा एकदा धोनीनं डिसीजन रिव्यू सिस्टम (DRS) बाबतचा आपला अंदाज आणि खेळातील निरिक्षण किती अचूक आहे, हे स्पष्ट केलं.

सोशल मीडियावर धोनीचा हा स्वॅग चांगलाच गाजताना दिसला. मैदानात त्याच्या या रिव्ह्यूनंतर जितका कल्ला झाला, तितकाच गोंधळ सोशल मीडियावरही झाल्याचं पाहायला मिळालं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.