शहरात दुर्देवी घटना घडली आहे. रिक्षा आणि चारचाकीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चारचाकीत वाहनातील 4 गणेश भक्तांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. तर या अपघातामध्ये काही जण जखमीही झाल्याचीही प्राथमिक माहिती मिळत आहे. मृत आणि जखमींना उल्हासनगरगच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं आहे. तर घटनास्थळी पोलिस पोहचले आहेत. या घटनेमुळे अंबरनाथ आणि आसपासच्या भागत हळहळ व्यक्त केली जात आहे.
अंबरनाथच्या पालेगाव भागात हा भीषण अपघात झालाय. हा अपघात इतका भीषण होता, की 4 जणांचा जागीच अंत झाला. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त वाहनातील लोकं ही गणेश विसर्जनासाठी आल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र याबाबतची नेमकी माहिती अजूनही मिळू शकलेली नाही. दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातात जखमी आणि मृत पावलेल्यांना पोलिसांनी मध्यवर्ती जिल्हा शासकीय रुग्णालयात नेलं. अपघातातील सर्वच हे उल्हासनगरचे होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.
ऐन गणेशोत्सवात अशी दुर्देवी घटना घडली. गणेशाला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात भक्तमंडळी बाहेर पडतात. मात्र या भक्तांना काळाने रस्त्यातच घेरलं. दुर्देवाने या अपघातात मृत्यू झाला. त्यामुळे सनासुदीच्या काळात शहरात शुकशुकाट पसरला आहे.