टीम इंडियाने 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेच्या चौथ्या सामन्यात इंग्लंडचा 157 धावांनी पराभव केला. टीम इंडियाच्या या विजयावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आनंद व्यक्त केला आहे. यासह, पीएम मोदींनी लसीकरणाबाबत बोलतानाही सोमवारच्या आकडेवारीचं वर्णन ‘विलक्षण’ असं केलं आहे.
टीम इंडियाच्या विजयावर पंतप्रधान मोदींनी ट्विट केलं, की ‘लसीकरणाच्या आघाडीवर आणि क्रिकेटच्या खेळपट्टीवर (पुन्हा) महान दिवस. नेहमीप्रमाणे, टिम इंडिया जिंकली! ‘ CoWIN वर उपलब्ध आकडेवारीनुसार, आज देशात 1,08,36,984 कोविड लसीचे डोस देण्यात आले आहेत, ज्यामुळे एकूण लसीची व्याप्ती 69,72,90,716 झाली आहे.
भारताने लसीकरणाच्या बाबतीत एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. गेल्या 11 दिवसांत तिसऱ्यांदा कोविड -19 लसींचे एक कोटीहून अधिक डोस भारतात देण्यात आले. यासह, देशात आतापर्यंत दिलेल्या एकूण डोसची संख्या 69.72 कोटीहून अधिक झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विट केलं, की ‘सप्टेंबरची सुरुवात उच्च स्तरावर झाली आहे आणि भारताने आज एक कोटी कोविड लसींचे डोस दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम नवीन उंची गाठत आहे.