उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे जेष्ठ नेते कल्याणसिंह यांचे शनिवारी रात्री 9 वाजून 15 मिनिटांनी निधन झाले. कल्याण सिंह 89 वर्षाचे होते. त्यांचे अंतिम संस्कार 23 ऑगस्टला होणार आहे.
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी कल्याण सिंह यांच्या निधनावर शोक व्यक्त करीत राज्यात तीन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर केला आहे.
कल्याण सिंह यांच्या अंतिम दर्शनाचा कार्यक्रम
आज सकाळी 9 ते 11 वाजेपर्यंत लखनऊमध्ये कल्याण सिंह यांच्या घरी अंतिम दर्शन घेतले जाईल. त्यानंतर11 ते 1 वाजेपर्यंत उत्तरप्रदेश विधानसभेत अंतिम दर्शनासाठी कल्याण सिंह यांचे पार्थिव ठेवले जाईल. 1 ते 3 वाजेपर्यंत भाजपच्या कार्यलयात अंतिम दर्शन घेता येईल. त्यानंतर कल्याण सिंह यांचे पार्थिव मूळ गावी म्हणजेच अलिगड येथे अंतिम दर्शन आणि अंतिम संस्कारासाठी नेण्यात येणार आहे.
दीर्घ आजारपणामुळे कल्याण सिंह यांचे शनिवारी रात्री निधन झाले. 4 जुलै रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्या आले होते.
(फोटो गुगल)