बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री हुमा कुरेशीनं आपला वाढदिवस (Birthday) साजरा करत आहे. गँग्स ऑफ वासेपुर या चित्रपटाद्वारे हूमानं 2012 साली बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता आणि तिचा अभिनय सर्वांनाच आवडला होता. हुमा बॉलिवूडमध्ये अनेक वर्षांपासून आहे आणि तिने आपली खास ओळख निर्माण केली आहे. आज हुमा यांच्या वाढदिवशी आम्ही तुम्हाला तिच्या नेट वर्थबद्दल सांगत आहोत.
गँग्स ऑफ वासेपुर नंतर हुमा इश्किया, हायवे, जॉली एलएलबी 2 यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये दिसली आहे. आपल्या अभिनयानं सर्वांची मन जिंकणारी हुमा कुरेशी शाही जीवनशैली जगते.
हुमा कुरेशीची एकूण मालमत्ता सुमारे 22, 4 कोटी आहे. ती चित्रपटात काम करण्याबरोबरच ब्रँड अँन्डॉर्सेसद्वारेही कमाई करते, जर अहवालांवर विश्वास ठेवला तर हुमा एका चित्रपटात काम करण्यासाठी 2-3 कोटी रुपये घेते.
हुमाला लक्झरी कारची आवड आहे. तिच्याकडे SUV Land Rover Freelander, Mercedes Benz अशा अनेक गाड्या आहेत.
कॉलेज संपल्यानंतर हुमानं थिएटर करायला सुरुवात केली. थिएटर केल्यावर ती नशीब आजमावण्यासाठी मुंबईत आली. मुंबईत तिने अनेक चित्रपटांसाठी ऑडिशन दिल्या मात्र यशस्वी झाली नाही. त्यानंतर हुमानं जाहिरांतींसाठी काम करायला सुरू केली. हुमाला बॉलिवूडमधील मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आणि किंग ऑफ रोमांस शाहरुख खान यांच्यासोबत एका जाहिरातीमध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि तिचे नशीब चमकलं. 2012 साली हुमाला ‘गँग्स ऑफ वासेपुर’ या चित्रपटाची ऑफर देण्यात आली होती. (छायाचित्र गुगलवरून साभार)