जेव्हा केव्हा चाकूचा विषय निघतो तेव्हा जपानी चाकूचा उल्लेख होतोच होतो. अनेक व्हिडीओ प्लॅटफॉर्मवर या चाकूचे व्हिडीओ कायमच व्हायरल होत असतात. विशेष म्हणजे या चाकूची किंमत थोडी थोडकी नसून तब्बल 65 हजार रुपये आहे. एका चाकूसाठी इतके पैसे कोण मोजतं असाही प्रश्न तुमच्या मनात येईल. पण जपानच्या या चाकुची किंमत केवळ जास्त नाही, तर त्याची वैशिष्ट्ये देखील आहेत. म्हणूनच इतका महागडा चाकू असतानाही त्याला जगभरातून मागणी आहे. आज जाणून घेऊयात या चाकूची खास बात.
जपानमधील हॉटेलमध्ये वापरण्यात येणारे चाकू हे अतिशय धारधार असतात. या चाकूने अतिशय कठीण, टणक वस्तूही सहज कापता येते. यामुळे अनेक जणांना हे चाकू खरेदी करायचे असतात. या चाकूंची किंमतही खूप असते. साधारण 900 ते 1000 डॉलरला एक चाकू मिळतो. म्हणजे भारतीय रुपयांमध्ये सांगायचे झाले तर एका चाकुसाठी तब्बल 65 हजार रुपयांपेक्षा अधिक पैसे मोजावे लागतात.
बिजनेस इनसाइडरच्या एका रिपोर्टनुसार, जपानी शेफ वापरतात त्या चाकूची डिझाईन खूप खास असते. यामुळे या चाकूंना खूप धार असते. या चाकूचा उपयोग करुन कोणतीही गोष्ट सहज कापता येते. यामुळेच जगभरातील टॉपच्या रेस्टोरंटमध्ये या चाकूची मागणी असते. तसेच चाकूवर करण्याच येणारे नक्षीकामही वैशिष्ट्यपूर्ण असते. म्हणूनच जे चाकू जगभरात प्रसिद्ध आहेत.