राकेश झुनझूनवाला यांनी Titan कंपनीची भागिदारी केली कमी

शेअर बाजारातील बिग बुल समजल्या जाणाऱ्या राकेश झुनझूनवाला यांनी कोरोना संकटच्या दरम्यान मोठी खेळी खेळली आहे. राकेश यांनी जून तिमाहीमध्ये आपल्या पोर्टफोलिओमध्ये सामिल असलेल्या Titan कंपनीची भागिदारी कमी केली आहे.

राकेश झुनझूनवाला यांच्याकडे असलेल्या टायटन कंपनीचे शेअर्स नेहमीच चर्चीला जाणारा मुद्दा आहे. त्याच्या पोर्टफोलिओमध्ये सर्वाधिक शेअर या कंपनीचे आहेत. परंतु त्यांनी टायटनचे 22.50 लाख शेअर विकले आहेत. मार्च तिमाहीपर्यंत त्यांची कंपनीतील भागिदारी 5.1 टक्के होती. ती घसरूऩ आता 4.8 इतकी झाली आहे. झुनझूनवाला यांनी 2003 मध्ये या कंपनीच्या शेअर्सला आपल्या पोर्टफोलिओमध्ये सामिल केले होते. त्यावेळी शेअरचा भाव 3 रुपये होता. आता एका शेअरचा भाव 1700 पेक्षा अधिक आहे.

टायटनच्या स्टॉकमध्ये राकेश यांनी आपली भागिदारी कमी केली असली तरी, परदेशी गुंतवणूकदारांचा या स्टॉकवर विश्वास कायम आहे. परदेशी गुंतवणूकदारांची भागिदारी 18.1 टक्क्यांनी वाढून 18.41 टक्के इतकी झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.