बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण ही सध्याच्या आघाडीच्या अभिनेत्रींमधील एक मानली जाते. सोशल मीडियावर तिने अपलोड केलेला एक फोटो किंवा नेटिझन्सने क्लिक केलेला एखादा फोटो बघताक्षणी व्हायरल होतो. नुकतंच दीपिकाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनने दीपिकासोबतचे काही फोटो पोस्ट केले आहे. यावेळी दीपिकाने लाल रंगाचे ओव्हरसाईज स्वेटर परिधान केले आहे. यात ती फार सुंदर दिसत आहेत. सध्या तिने घातलेल्या या स्वेटरच्या किंमतीवरुन चर्चा रंगली आहे.
दीपिका आणि हृतिक सध्या त्यांच्या आगामी फायटर चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत. नुकतंच हृतिक रोशनने काही फोटो सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. फायटर गँग टेकऑफसाठी रेडी आहेत, असे कॅप्शन त्याने याला दिले आहे.
यावेळी दीपिका लाल रंगाच्या ओव्हरसाईज स्वेटर आणि wide leg जिन्समध्ये दिसत आहे. या कपड्यात दीपिका पूर्णपणे वेगळ्या अवतारात दिसत आहे. दीपिकाने घातलेले हे स्वेटर Balanciaga या महागड्या ब्रँडचे आहे. हे स्वेटर ओव्हरसाईज असून ते फूल नेक आहे.
जर तुम्हालाही दीपिकासारखे Balanciaga ब्रँडचे स्वेटर घ्यायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला 773 अमेरिकन डॉलर खर्च करावे लागतील. म्हणजेच यासाठी तुम्हाला 57 हजार 582 रुपये खर्च करावे लागतील. हे स्वेटर Farfetch या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
दीपिका धूम 4 (Dhoom 4) मध्ये लवकरच दिसू शकते. मीडिया रिपोर्टनुसार दीपिका पादुकोण या चित्रपटात स्टाईलिश चोरणीची भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाविषयी दीपिकाबरोबर चर्चा सुरू आहे. दीपिका सध्या शाहरुख खानसोबत पठाण चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. रिपोर्टनुसार जॉन अब्राहम पठाण या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी शाहरुख आणि दीपिकाची जोडी ‘ओम शांती ओम’ चेन्नई एक्सप्रेस आणि हॅपी न्यू इयरमध्ये दिसली होती, ही जोडी चाहत्यांनी खूप आवडली होते.
दीपिका पादुकोण सध्या शकुन बत्राच्या सिद्धांत चतुर्वेदी आणि अनन्या पांडे यांच्या पुढच्या चित्रपटाची शूटिंग करत आहे. अलीकडेच दीपिकाने एक फोटो शेअर केला आहे. ज्यात तिने ओन्ली लव्ह लिहिले होते, दीपिकाच्या आगामी चित्रपटाचे शीर्षक असण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.