दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर आता सीईटी परीक्षेबाबत ही सरकार लवकरच निर्णय घेणार आहे. राज्यातील बारावीनंतरचे प्रवेश कसे करायचे याबाबतचा निर्णय बारावी निकालाचा फॉर्म्युला ठरल्यानंतर घेतला जाणार आहे. MHT-CET 2021
विद्यार्थ्यांना त्रास न होता प्रवेश कसा देता येईल यासाठी उदय सामंत राज्यातील सर्व १३ विद्यापीठांच्या कुलगुरूंशी चर्चा करून निर्णय घेणार आहेत. या बैठकीत बारावीनंतर बीए, बीएससी, बी कॉम शाखेतील प्रवेश कसे करायचे याचा निर्णय घेतला जाणार आहे. तर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी होणारी राज्य सीईटीची परीक्षा ऑनलाईनच होणार आहे.
प्रत्यक्ष परीक्षा केंद्रावर जाऊनच सीईटीची परीक्षा द्यावी लागेल. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सीईटीची परीक्षा घेण्याचा उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा विचार आहे.
दरवर्षी जवळपास साडे पाच लाख विद्यार्थी सीईटी परीक्षेसाठी साठी बसतात. सीईटीच्या परीक्षेसाठी तालुका स्तरापर्यंत केंद्र वाढवले जाणार आहेत. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज सीईटी सेलची बैठक घेतली. पॉलिटेक्निकचे प्रवेश दहावीच्या निकालावर देण्यात येणार आहेत. बारावीच्या निकालाचा पॅटर्न कळल्यानंतर पुढील प्रवेश प्रक्रियेचा निर्णय होणार आहे.