अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचा मुलगा हंटर बायडन कायमच वादात सापडतो. यावेळी तो एका मोठ्या वादात सापडला असून त्याच्या अडचणीत चांगलीच वाढ झालीय. हंटर बायडनने रशियाच्या एका कॉलगर्लला वडिलांच्या खात्यावरुन 25 हजार डॉलर (जवळपास 18 लाख 55 हजार रुपये) पाठवलेत. न्यूयॉर्क टाईम्सने याबाबत वृत्त दिलंय. याप्रमाणे, हंटरने मे 2018 मध्ये एका 24 वर्षीय महिलेसोबत काही दिवस घालवले. या बदल्यात या कॉलगर्लला पेमेंट करताना त्यांनी जो बायडन यांच्या खात्याचा वापर केला. ही घटना घडली तेव्हा हंटर लॉस एंजिल्समध्ये नावाचा व्यक्ती म्हणून हॉटेलमध्ये थांबले होते.
हंटर बायडन आपल्या लॅपटॉपमध्ये प्रत्येक गोष्टीची माहिती सेव्ह करुन ठेवायचे. या लॅपटॉपमध्ये सर्व मेसेज, फायनान्शियल रेकॉर्ड आणि फोटो सेव्ह होते. मात्र, एक दिवस ते डेलावेयरच्या दुरुस्ती दुकानात हा लॅपटॉप विसरले. यानंतर एक वर्षांनी हा लॅपटॉप अमेरिकेची तपास संस्था एफबीआयच्या हाती लागला. यातून अनेक खुलासे झाले. हंटरने रशियाच्या कॉलगर्ल यानाला स्वतःचं नाव ‘रॉब’ सांगितलं होतं. नंतर ती हंटरच्या कॉटेजवर आली. येथे दोघांनी वोडका पिली आणि सोबत काही व्हिडीओ काढले.
कॉलगर्लचं पेमेंट करताना अनेकदा ट्रांजेक्शन फेल
काही दिवस सोबत राहिल्यानंतर कॉलगर्ल यानाने हंटरकडे याच्या पेमेंटपोटी 8 हजार डॉलर (5 लाख रुपये) मागितले. मात्र, त्यावेळी हंटरकडील कोणत्याही डेबिट कार्डमधून अनेक प्रयत्न करुनही ट्रांजेक्शन होईना. म्हणून त्याने स्वतःकडील एका वेगळ्या कार्डातून यानाला पैसे दिले. मात्र नंतर फेल झालेले ट्रांसफर देखील पूर्ण होऊन कॉलगर्लला अनेक पट पैसे गेले. तेव्हा सिक्रेट सर्विस स्पेशल एजेंटचाही हंटरला फोन आला. तेव्हा हंटरने त्याला पैसे ‘सेल्टिकच्या अकाऊंटमधून’ दिल्याचे सांगितले.
जो बायडन 2009-2017 या काळात अमेरिकेचे उपराष्ट्रपती होते. तेव्हा त्यांचं सीक्रेट सर्विस कोड नाव ‘सेल्टिक’ होतं. टेक्स्ट मेसेजमधून पुढे हेही समोर आलं की अधिकचे पैसे कॉलगर्लने परत पाठवले. मात्र, यानाच्या अकाऊंटमध्ये काही तांत्रिक दोष झाल्यानं ती 5 हजार डॉलर ट्रांसफर करु शकली नाही. असं असलं तरी हंटर आणि याना या दोघांमध्ये काय संबंध होता याची माहिती मिळू शकलेली नाही.