फक्त चित्रपटांमध्येच नाही तर राखी खऱ्या आयुष्यातही प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी आहे. राखीनं प्रेक्षकांच्या हृदयात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. बिग बॉस 14 दरम्यान राखीच्या उपस्थितीनं बिग बॉस अधिक रंजक ठरला. आता राखीला पुढच्या सीझनमध्येही बिग बॉसच्या घरात जाण्याची इच्छा आहे.
बिग बॉसच्या पुढच्या सीझनमध्ये तिला पुन्हा बोलवण्यात यावं अशी राखीची इच्छा आहे. मात्र या हंगामात तिला पती रितेशबरोबर एन्ट्री घ्यायची आहे.
राखी म्हणते की मला माझ्या नवऱ्यासोबत बिग बॉसच्या घरात जायचं आहे, त्यानं शिकून आणि समजून घ्यावं की त्यानं माझ्याशी लग्न केलं आहे. मला त्याच्याबरोबर जायचे आहे. सलमान खान, बिग बॉसनं आत जाऊन त्याला धडा शिकवावा की लग्नानंतर तो आपल्या पत्नीला असे सोडू शकत नाही.
राखी पुढे म्हणाली, मी माझ्या पतीबरोबर कधीच राहीले नाही. जर मी बिग बॉसमध्ये त्याच्यासोबत गेले तर आम्ही एकत्र कसे राहतो हे संपूर्ण देशाला दिसेल. मला आमच्या नात्यावर 100% काम करायचं आहे.
मला रितेशबद्दल जास्त माहिती नाही. माझा विश्वास आहे की एका आयुष्यात फक्त एकच पती, एकच नाते, एकच देव असावा. रिपोर्टनुसार रितेश व राखी वागळे राहतात.