शिवसेनेचे दिग्गज नेते विजय शिवतारे यांना ह्रदयविकाराचा झटका
शिवसेनेचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे ह्रदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुंबईमधील ब्रीच कॅण्डी रुग्णालयाच्या आयसीयूत ते दाखल आहेत. त्यांच्या मुलीने फेसबुकवर पोस्ट टाकत गंभीर आरोप केले असून यामुळे शिवतारे कुटुंबातील कलह समोर आला आहे. मुलांनी दिलेल्या त्रासामुळेच ह्रदयविकाराचा झटका आल्याचं त्यांनी सांगितलं आहे. भावांच्या संपत्तीच्या लोभापायी वडिलांची ही दयनीय अवस्था झाल्याचं म्हटलं आहे. ममता लांडे-शिवतारे यांनी ही पोस्ट लिहिली असून विजय शिवतारे यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन शेअर केली आहे. ममता या आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांच्या पत्नी आहेत.
सरकार आहे की तमाशा : फडणवीस
दोन दिवसांच्या अधिवेशनाचा आम्ही निषेध करतो. बैठकीवर बहिष्कार टाकला आहे. यासंदर्भात सरकारला अधिवेशनात जाब विचारू. आम्ही शांत बसू शकत नाही. लोकशाही मूल्यांची पायमल्ली आणि लोकशाहीची मुस्कटदाबी होत असेल, तर जनतेचा आवाज आम्हाला बनावंच लागेल. या सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचं आणि मराठा समाजाचं आरक्षण गेलं. या सरकारचे मंत्री स्वतः मोर्चे काढत आहे. ज्यांना निर्णय घेण्याचे अधिकार आहेत, ते मोर्चे काढत आहेत आणि कोर्टात बाजू मांडत नाहीत. सरकार आहे की तमाशा, अशी परिस्थिती जनतेला बघायला मिळत आहे,” असा हल्लाबोल फडणवीस यांनी केला.
दूरध्वनी करून ‘आशांच्या संपाला
जबाबदार कोण’ असा जाब विचारणार
माझे कुटुंब माझी जबाबदारी’ आशा सेविकांकडून करून घेणारे सरकार आता आशांना योग्य मानधन देण्याच्या मुद्द्यावर ‘सरकारी जबाबदारी’मधून पळ काढत आहे. त्यामुळे यापुढे ‘आशांची फसवणूक, सरकार जबाबदार’ असे अभिनव आंदोलन करण्याचा निर्णय आशा संघटनांनी घेतला आहे. याअंतर्गत स्थानिक आमदारांच्या घरासमोर थाळीनाद करून न्यायाची मागणी केली जाणार आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी हजारो आशा सेविका रोज दूरध्वनी करून ‘आशांच्या संपाला जबाबदार कोण’ असा जाब विचारणार आहेत.
जेट एअरवेज पुन्हा एकदा
उड्डाण करण्याच्या तयारीत
आर्थिक संकटात अडकलेली जेट एअरवेज पुन्हा एकदा उड्डाण करण्याच्या तयारीत आहे. वित्तसंस्था नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलच्या (एनसीएलटी) मुंबई खंडपीठाने कारलॉक कॅपिटल आणि मुरारी लाल जालनच्या ठराव आराखड्यास मंजुरी दिली असल्याचं वृत्त पीटीआयने दिलं आहे. जेट एअरवेजने आर्थिक संकटामुळे १७ एप्रिल २०१९ मध्ये आपलं काम थांबवलं आहे.
भारतामध्ये इतक्यात करोनाची
तिसरी लाट येणार नाही
गुंतवणूक क्षेत्रातील मोठे प्रस्थ आणि दलाल स्ट्रीटचे तसेच भारताचे ‘वॉरेन बफेट’ म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला यांनी भारतामध्ये करोनाची तिसरी लाट येणार नाही असं मत व्यक्त केलं आहे. मुलाखतीमध्ये झुनझुनवाला यांनी, “मी तुम्हाला पैजेवर पैसे लावून सांगायला तयार आहे की भारतामध्ये इतक्यात (करोनाची) तिसरी लाट येणार नाही,” असं म्हटलं आहे.
जबरदस्ती धर्मांतर करणाऱ्यांना
रासूका खाली अटक करा
दिल्ली आणि उत्तर प्रदेशात सुमारे एक हजार लोकांचं जबरदस्ती धर्मांतर करण्यात आल्यामुळे उत्तर प्रदेशातील योगी सरकार खडबडून जागे झाले आहे. जबरदस्तीने होणारे धर्मांतर रोखण्यासाठी योगी सरकारने महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. जबरदस्ती धर्मांतर करणाऱ्यांना रासूका (राष्ट्रीय सुरक्षा कायदा) खाली अटक करा आणि अशा लोकांची संपत्तीही जप्त करा, असे आदेश योगी यांनी दिले आहेत. विशेष म्हणजे धर्मांतराविरोधात यूपीत कठोर कायदा लागू असताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हे निर्देश दिले आहेत.
खासदार नवनीत कौर यांना
सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा
अमरावतीचे अपक्ष खासदार नवनीत कौर यांना आज सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. नवनीत कौर राणा यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. याव्यतिरिक्त सुप्रीम कोर्टाने प्रतिवाद्यांना नोटीस बजावल्या आहेत. न्यायमूर्ती विनीत शरण आणि न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी यांच्या खंडपीठाने ८ जून रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देत सर्व प्रतिवाद्यांना नोटीस बजावत चार आठवड्यांत उत्तर देण्यास सांगितले. पुढील सुनावणी २५ जून रोजी होईल.
अर्णब गोस्वामीचे नाव
आरोपपत्रात दाखल
टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट (टीआरपी) घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी मंगळवारी रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरुद्ध दुसरे आरोपपत्र दाखल केले आहे. याप्रकरणी तक्रार नोंदवल्यानंतर नऊ महिन्यांनी पोलिसांनी अर्णब गोस्वामीची नाव आरोपपत्रात दाखल केले आहे.
नागपूर विद्यापीठाचा परीक्षा
शुल्क माफीचा निर्णय
कोरोनाच्या काळात विद्यार्थी आर्थिक अडचणीतून जात आहेत. यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ परीक्षा शुल्क माफीचा निर्णय घेणारे पहिले विद्यापीठ ठरले आहे. यासोबत विद्यार्थ्यांकरिता जीवन विमा आणि अपघात विमा सुद्धा काढण्याचा महत्वपूर्ण निर्णय विद्यापीठाने घेतला असून त्यामुळे विद्यार्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सलग दुसऱ्या वर्षी
अमरनाथची यात्रा रद्द
देशातील सध्याची कोरोनाची स्थिती आणि कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून सलग दुसऱ्या वर्षी अमरनाथची यात्रा रद्द करण्यात आली आहे. मात्र भाविकांना 28 जूनपासून ऑनलाईन दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जम्मू काश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.
मराठा मूक आंदोलन
महिनाभरासाठी स्थगित
मराठा आरक्षणासाठी पुणे ते विधानभवन लाँगमार्च काढावा अशी आमची इच्छा नाही. सरकारने एक महिन्यात आमच्या मागण्या मार्गी लावाव्या. आमची आंदोलने थांबली नाहीत. बैठकाही सुरूच राहणार आहेत. मात्र, सरकार 21 दिवसात प्रश्न मार्गी लावत असल्याने एक महिना मराठा मूक आंदोलन पुढे ढकलत आहोत, असं जाहीर करतानाच या महिन्याभरात आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवली जाईल, असा इशारा खासदार संभाजी छत्रपती यांनी दिला आहे.
SD social media
9850 60 3590