राजा महाराजांच्या कहाण्या तुम्ही ऐकल्या किंवा वाचल्या असणार. त्यांच्या शूरतेचे किस्से ही तुम्ही ऐकले असणार, ज्यामध्ये काही राजांना आपल्या राज्यासाठी तर कधी कोणाच्या भल्यासाठी, तर कधी एखादी राज कुमारी आवडली, म्हणून राजाने अनेक लग्न केलेल्या कहाण्या तुम्ही ऐकल्या असतील. पंरतु हे सगळं आधीच्या काळात शक्य होते.
पंरतु आताच्या काळात हे शक्य नाही. पण आजच्या काळातही असे घडले आहे. ज्याचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये राजे महाराजांप्रमाणे एका माणसाने 36 लग्नं केली आहेत आणि आता तो 37 व्या वेळेस लग्नासाठी उभा राहिला आहे.
हा माणूस इतका म्हातारा आहे आणि त्याने एका तरुण मुलीशी लग्न केले आहे. याला दात घासायला दात नाही, परंतु या वयात याला लग्नाचा लाडू 37 व्यांदा चाखायची इच्छा झाली आहे. या सगळ्यात आश्चर्य करणारी गोष्ट अशी की, या माणसाने आपल्या 28 बायका आणि आपल्या मुलांच्या समोर हे लग्न केले. त्याच्या घरचेही या लग्नामध्ये इतके आनंदी दिसत आहेत की, जणू काही त्यांना काही फरक पडत नाहीय. सध्या हा व्हीडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
रुपीन शर्मा नावाच्या आयपीएस अधिकाऱ्याने हा व्हीडिओ ट्वीटरवर शेअर करत कॅप्शन लिहिले आहे, “28 बायका, 135 मुलं आणि 126 नातवंडांसमोर 37 व्यांदा लग्न करत आहे. किती बहाद्दूर माणूस आहे हा”
या माणसाने या आधी 36 लग्नं केली आहेत, त्यापैकी त्याच्या 28 बायका जिवंत आहेत, तो त्या 28 बायकांना एकत्र घेऊन राहातो. जिथे लोकांना एक बायको सांभाळाताना कठीण होत आहे, सारखी भांडणं होत असतात. तिथे हा माणूस 28 बायका एकत्र कशा सांभाळत असेल? हाच प्रश्न लोकांना पडला आहे.