अमेरिकन अंतराळ संस्था नासा गेल्या काही वर्षांत नवनवे संशोधन करू लागली आहे. अंतराळातील बरीच नवनवीन गुपिते उलगडण्यात या संस्थेला यश आले आहे. नजिकच्या काळात आणखी रहस्यांचा उलगडा करण्याचा निर्धार नासाच्या शास्त्रज्ञांनी केला आहे. याचदरम्यान 270 किलोमीटर उंचीवरून नासाने ‘क्युरियोसिटी’चे छायाचित्र टिपले आहे. मंगळाच्या डोंगरावर चढाई करणाऱ्या रोव्हरचा व्हिडिओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. अॅरिझोना विद्यापीठामध्ये चंद्र आणि ग्रह प्रयोगशाळेनुसार, नासाच्या मार्स रिकोनिसेन्स ऑर्बिटरने गेल क्रेटरच्या सेंटरजवळ मॉन्ट मर्कोवर चढणाऱ्या क्युरियोसिटी रोव्हरचा एक फोटो टिपला आहे.
एमआरओने 18 एप्रिल रोजी आपल्या ‘हाय रिझॉल्युशन इमेजिंग सायन्स एक्सपेरिमेंट टूल’चा वापर करून हा फोटो टिपला होता. ‘हाय रिझॉल्युशन इमेजिंग सायन्स एक्सपेरिमेंट टूल’ अत्यंत लहानात लहान वस्तूही टिपण्यात सक्षम आहे अर्थात या टूलद्वारे लहानात लहान वस्तूचाही फोटो काढता येतो. हायआरआयएसई टीमच्या माहितीनुसार, रोव्हरपासून 167.5 मैलांच्या उंचीवरूनही कारच्या आकाराचा क्युरोयोसिटी रोव्हर अगदी स्पष्टपणे दिसत होता. 2014 पासून क्युरियोसिटी रोव्हर 3 मैल उंच माऊंट शार्पची चढाई करीत आहे, लाल ग्रहावरील सूक्ष्मजीव जीवनाच्या मागील संकेतांचा शोध घेणे हे यामागील उद्दीष्ट आहे.
मार्चच्या सुरुवातीच्या काळात क्युरियोसिटीने मॉन्ट मार्कोवर चढाई सुरू केली, ज्याला फ्रान्समधील एका डोंगराचे नाव देण्यात आले आहे. मंगळ ग्रहावर दोन वर्षांत क्युरियोसिटीने पुष्टी केली की, गेल क्रेटर जीवनासाठी उपयुक्त अशा रासायनिक घटकांनी भरलेला एक सरोवर होता. यानंतर क्युरियोसिटीने सेंद्रीय पदार्थ शोधून काढला आहे. मंगळ ग्रह कोरडा पडल्यावर लहान आणि खारट तलाव बनल्याचे पुरावे सापडले आहेत.
येत्या काही वर्षांत मंगळ ग्रहावरील आणखी काही रहस्यांचा उलगडा होणार असल्याचे शुभसंकेत आहेत. क्युरियोसिटी मंगळाच्या भूतकाळाविषयी अधिक रहस्यांचा उलगडा करू शकेल, अशी शक्यता खगोलशास्त्रातील जाणकारांनी वर्तवली आहे. दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये नासाच्या जेट प्रोपल्शन प्रयोगशाळेच्या क्युरियोसिटीचे उप-प्रकल्प वैज्ञानिक अबीगैल फ्रॅमॅन यांनी एका व्हिडिओ अपडेटमध्ये सांगितले आहे की मॉन्ट मार्कोच्या पुढे सल्फेटच्या टेकड्या आहेत. त्यामुळेच आपण पुढे वाटचाल करीत आहोत, असा दावा फ्रॅमॅन यांनी केला आहे.
अमेरिकेची अंतराळ संस्था नासाचा क्युरियोसिटी रोव्हर मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागावर मीठ शोधण्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे. ज्यावरून हे समजेल की प्राचीन काळामध्ये लाल ग्रहावर अर्थात मंगळ ग्रहावर जीवन होते की नाही? मेरीलँडच्या ग्रीनबेल्टमधील नासा गोडार्ड स्पेस फ्लाइट सेंटरमधील वैज्ञानिक सध्या रोव्हरद्वारे टिपण्यात आलेली छायाचित्रे आणि डेटाचा सखोल अभ्यास करीत आहेत. मंगळावर सेंद्रिय किंवा कार्बनयुक्त मीठ अस्तित्त्वात असल्याचे आतापर्यंतच्या अभ्यासातून निदर्शनास आले आहे. याचे एजन्सीने सेंद्रीय संयुगांचे सेंद्रिय कंपाऊंड म्हणून वर्णन केले आहे.