एका राजपूत राजाने पाकिस्तानात बांधलेलं राम मंदिर, आजही आहे अस्तित्वात
सध्या भारतात सर्वत्र राम मंदिराची चर्चा होत आहे. राम मंदिरामुळे अयोध्या सध्या देशातच नाहीतर जगभरात चर्चेचा विषय बनला आहे. देशातील राम मंदिर उभारताना जगाच्या अनेक कोपऱ्यातही भगवान श्रीरामांची मंदिरे आहेत.तुम्हाला माहित आहे का की, पाकिस्तानातही राममंदिर आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या मंदिराला मोठी ओळख आहे आणि तिथले लोक आजही या मंदिरात पूजा करतात.
जेव्हा पाकिस्तान भारतापासून वेगळा नव्हता, तेव्हा इस्लामाबादच्या आसपास अनेक हिंदू राहत होते. त्यामुळेच या परिसरात अनेक मोठी मंदिरे होती. हे राम मंदिर इस्लामाबादच्या सैदपूर गावात आहे. 15 व्या शतकात बांधलेले हे मंदिर रामांचे आहे. श्री राम वनवासात असतानाही ते येथेच राहिले होते. या भूमीवर त्यांचे अस्तित्व होते, असे तेथील हिंदू समाजाचे लोक मानतात.हे मंदिर 1580 मध्ये हिंदू राजपूत राजा मान सिंह याने बांधले होते असे सांगितले जाते. फाळणीपूर्वी हे मंदिर भव्यतेसाठी ओळखले जात होते. मात्र, फाळणीनंतर या मंदिराची दुर्दशा झाली. मात्र 2016 मध्ये या मंदिराचा परिसर नूतनीकरण करून पाकिस्तानातील हिंदू समाजाच्या ताब्यात देण्यात आला.
“नार्वेकरांकडून सर्वोच्च न्यायालयाचा अपमान”; सरोदेंनी सांगितला कळीचा मुद्दा
महाराष्ट्रात शिवसेना विरुद्ध शिवसेना यांच्यातील लढत अद्याप संपलेली नाही. पक्षाच्या अधिकाराबाबत उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या अधिकाराबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा निर्णय चुकीचा मानला आणि शिवसेनेवर त्यांचाच खरा दावा असल्याचे म्हटले आहे. राहुल नार्वेकर यांनी नुकतात शिवसेना आमदारांबाबत निकाल दिला होता. नार्वेकरांनी शिवसेना पक्ष शिंदे गटाचा असल्याचा निकाल दिला तर दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र केले. तसेच प्रतोद म्हणून भरत गोगावले यांची नियुक्ती वैध ठरवली. महत्वाचे म्हणजे सुप्रीम कोर्टाने ही नियुक्ती अवैध असल्याचे म्हटले होते.
या सर्व प्रकरणावर ठाकरे गटाने महापत्रकार परिषद घेतली. जनता न्यायालय, असे शिर्षक पत्रकार परिषदेला दिला आहे. या पत्रकार परिषदेत अनेक दिग्गज वकील देखील हजर होते. वकील असीम सरोदे यांनी राहुल नार्वेकर यांच्या निकालाची चिरफाड केली. मनाला येईल त्याप्रमाणे कायद्याचा अर्थ काढता येत नाही. नार्वेकरांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनांचा अपमान केला. पक्ष सोडलेल्यांना दुसऱ्या पक्षात विलीन व्हावे लागेल किंवा वेगळा पक्ष, गट स्थापन करावा लागतो. पक्ष सोडलेल्यांना दुसऱ्या पक्षात विलीन व्हावे लागेल किंवा वेगळा पक्ष, गट स्थापन करावा लागतो, शिंदे गटाने असे काहीही केले नसल्याने त्यांचे आमदार अपात्र ठरतात, असे असीम सरोदे यांनी स्पष्ट केले.
विधानसभा अध्यक्षांच्या अडचणी वाढणार? अनिल परबांनी ‘त्या’ ५ ठरावांचे दिले दाखले
विधानसभा अध्यक्षांच्या निकालविरोधात ठाकरे गटाने जनतेच्या न्यायालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निकालाची चिरफाड करण्यात आली. आमदार अनिल परब यांनी निकालावर सखोल भाष्य केले.दोन्ही गटातील आमदरांना अपात्र न करण्याचा निर्णय राहुल नार्वेकरांनी घेतला. यामध्ये त्यांनी सांगितल आम्ही निवडणूक आयोगाला पत्र लिहलं आणि शिवसेनेच्या घटना मागवून घेतल्या. सुप्रीम कोर्टाने जेव्हा निरीक्षण नोंदवल त्यात एक महत्वाच वाक्य होतं की राजकीय पक्ष ठरवताना तुम्हाला केवळ विधीमंडळ पक्ष ठरवता येणार नाही. याबरोबर मुळ राजकीय पक्ष, त्याची घटना, संघटनात्मक रचाना लक्षात घ्यावी लागते. उतर चाचण्या देखील घेण महत्वाचं आहे. मात्र कोणतेही निकष तपासण्यात आले नाहीत.
मराठा समाजाच्या सर्वेक्षणासाठी लागणार अडीच हजार कर्मचारी
मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्यासाठी राज्य मागासवर्गीय आयोगातर्फे सर्वेक्षण केले जाणार आहे. महापालिकेने या कामासाठी १ हजार ५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. सुमारे १२ लाख घरांमध्ये जाऊन हे काम करावे लागणार असल्याने एकूण अडीच हजार कर्मचाऱ्यांची गरज भासणार आहे, त्यामुळे आणखी दीड हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची तयारी महापालिका प्रशासनाने सुरु झाले आहे.मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी गेल्या काही महिन्यांपासून आंदोलने सुरु आहेत. तर दुसरीकडे ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यापेक्षा मराठा समाजासाठी स्वतंत्र कोटा दिला जाईल, हे आरक्षण न्यायालयात टिकणारे असेल असे आश्वासन राज्य सरकारने दिले आहे.
तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावंकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर
राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ तमाशा कलावंत श्रीमती हिराबाई कांबळे (सन २०२१) व अशोक पेठकर (सन २०२२) यांना जाहीर केला आहे.
पाच लाख रुपयांचा धनादेश, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असून मार्च महिन्यात मुंबई येथे होणाऱ्या कार्यक्रमात पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. अशी माहिती विठाबाई नारायणगावंकर जीवनगौरव पुरस्कार निवड समितीचे माजी सदस्य खंडूराज गायकवाड यांनी दिली.
मुंबईत निच्चांकी तापमानाची नोंद
मुंबईत निच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. यामुळे गारवा जाणवत असून रात्री हुडहुडी भरावणारी थंडी पसरली आहे. यामुळे उशिरा का होईना मुंबईकरांना थंडीचा अनुभव घेता येत आहे.मुंबईत सोमवारी रात्री किमान तापमान १६ अंशांपर्यंत खाली गेले. सांताक्रूझ येथे १६.२ तर कुलाबा येथे १८.८ अंश किमान तापमान नोंदवले गेले. यंदाच्या मोसमातील हे सर्वात निच्चांकी तापमान ठरले आहे. किमान तापमान खाली गेल्याने मुंबईकरांना पुढील काही दिवस थंडीचा अनुभव घेता येणार आहे.
कूनो राष्ट्रीय अभयारण्यात ‘शौर्य’चा मृत्यू, आत्तापर्यंत १० चित्त्यांचा विविध कारणांनी गेला जीव
मध्य प्रदेशातली कूनो राष्ट्रीय अभयारण्यात आणखी एका चित्त्याचा मृत्यू झाला. हा चित्ता नामबियातून आणण्यात आला होता. त्याचं नाव शौर्य असं ठेवण्यात आलं होतं. शौर्य हा नामिबीयातून आणलेला दहावा चित्ता होता. कूनो या अभय अरण्यात मृत्यू झालेल्या चित्त्यांची संख्या आता दहा झाली आहे. सिंह प्रकल्पाच्या संचालकांनी एक पत्रक जारी केलं आहे. त्यात हे नमूद करण्यात आलं आहे की १६ जानेवारी या दिवशी दुपारी ३.१७ च्या दरम्यान शौर्य या चित्त्याचा मृत्यू झाला. मृत्यूचं कारण शवविच्छेदनानंतर कळणार आहे असंही सांगण्यात आलं आहे. हा चित्ता जंगलात बेशुद्ध अवस्थेत आढळला होता. त्याच्यावर उपचार सुरु होते.कूनो नॅशनल पार्कमध्ये प्रोजेक्ट चित्ताच्या अंतर्गत नामीबिया आणि दक्षिण अफ्रिका या ठिकाणाहून २० चित्ते आणण्यात आले होते. या चित्त्यांची चर्चा देशभरात झाली होती. यानंतर आतापर्यंत सात मोठे आणि ३ बछडे अशा दहा चित्त्यांचा मृत्यू झाला.
अयोध्येला न जाता कसा पाहू शकता श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा?
अयोध्येमध्ये २२ जानेवारीला होणाऱ्या श्री राम मंदि रप्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित संपूर्ण देशामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. हा कार्यक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी ८००० पेक्षा जास्त पाहुण्यांना आमंत्रिक केले होतो. विशेष म्हणजे या खास दिवशी पूर्ण अयोध्या शहर भव्य स्वरुपामध्ये सजवले जाईल.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात काय होणार, कोणते पाहूणे येणार आहेत, पूजा कशी होणार, मंदिराची वैशिष्ट्ये काय आहेत याची उत्सुकता सर्वांना आहे. अशा परिस्थितीत, प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचा प्रत्येक सेकंद तुम्ही घरी बसून कसा पाहू शकता. होय. तुम्ही अयोध्येला जाणार नसेल तरीही घरबसल्या तुम्ही प्रभु रामाचे दर्शन घेऊ शकता. कसे ते जाणून घ्या… केंद्र सरकारच्या सुचनेनुसार पीआयबीच्या २२ जानेवारीच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमामध्ये देशभरातील लोकांपर्यंत पोहण्यासाठी दुरदर्शनद्वारे खास व्यवस्था केली जाणार आहे. त्यासाठी दुरदर्शन अयोध्येत राम मंदीर आणि आसपास ४० कॅमेऱ्या लावणार आहे आणि ४के( 4K) डिस्प्लेवर थेट प्रसारण केले जाणार आहे. डीडी नॅशनल आणि डीडी न्युजवर याचे थेट प्रसारण होणार आहे.फक्त २२ जानेवारीलाच नाही तर २३ जानेवारीला दुरदर्शनवर प्रभु रामााची विशेष आरतीचे आणि मंदिराचे उद्घाटनही थेट प्रक्षेपण केले जाईल. मुख्य मंदिर परिसराव्यतिरिक्त, दूरदर्शन आपल्या विविध चॅनेलवर शरयू नदीच्या घाटाजवळील राम की पायडी, कुबेर टिळा येथील जटायू पुतळा आणि इतर ठिकाणी थेट प्रक्षेपण करेल.
आंध्र प्रदेशात भाऊ विरुद्ध बहीण सामना, शर्मिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी
आंध्र प्रदेश काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी माजी मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी यांची कन्या वाय. एस. शर्मिला यांची नियुक्ती करण्यात आल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी विरुद्ध त्यांची बहीण शर्मिला यांच्यात सामना होणार आहे. काँग्रेसला सत्ता मिळाल्यास शर्मिला हा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असेल, असेच संकेत आहेत.
जावेद अख्तर यांनी मुनव्वर राणांच्या पार्थिवाला दिला खांदा
सिनेमाचे पटकथा लेखक, गीतकार जावेद अख्तर हे लखनऊ या ठिकाणी पोहचले. शायर मुनव्वर राणा यांच्या कुटुंबाचं त्यांनी सांत्वन केलं. तसंच शायर मुनव्वर राणा यांच्या पार्थिवाला त्यांनी खांदाही दिला. यावेळी जावेद अख्तर चांगलेच भावूक झालेले पाहण्यास मिळाले. भारतीय शायरीचं खूप मोठं नुकसान झालं आहे अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावनांना वाट करुन दिली.
सुमित नांगलची ऐतिहासिक कामगिरी! १९८९ नंतर ग्रँड स्लॅम स्पर्धेत अग्रमानांकित खेळाडूला पराभूत करणारा पहिला भारतीय
भारतीय टेनिसपटू सुमित नागल याने इतिहास रचत मोठी कामगिरी केली आहे. त्याने अग्रमानांकित खेळाडूला एकेरी सामन्यात पराभूत करत ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँड स्लॅम स्पर्धेत मोठा अपसेट केला आहे. त्याने ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. मुख्य फेरीच्या पहिल्या फेरीत त्याने २७व्या मानांकित अलेक्झांडर बुब्लिकचा पराभव केला. नागलने हा सामना ६-४, ६-२, ७-६ असा सरळ सेटमध्ये जिंकला. अलेक्झांडरचे या स्पर्धेत ३१वे मानांकन होते. त्याचा पराभव करत त्याने सर्वानाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.
दरवर्षी मुंबईत होणारा फिल्मफेयर यंदा गुजरातला!
हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोकृष्ट कलागुणांचा गौरव करणारा तारांकित सोहळा काही दिवसात पार पडणार आहे. गुजरात टुरिझमच्या सहकार्याने ६९ व्या फिल्मफेअर अवॉर्ड २०२४, हा २७ जानेवारी २०२४ रोजी पार पडणार आहे.
यंदा हा प्रतिष्ठित पुरस्कार सोहळा गुजरातमधील गांधीनगर येथे पार पडणार आहे. या बहुप्रतिक्षित कार्यक्रमाच्या तपशिलांचे अनावरण करण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली होती.
पत्रकार परिषदेला करण जोहर, जान्हवी कपूर, वरुण धवन उपस्थित होते. त्यांच्यासोबत रोहित गोपकुमार आणि पॅनेलचे इतर सदस्य ही उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात वरुण आणि जान्हवीने दीप प्रज्वलन करून केली. अनेक स्टार्स या अवॉर्ड मध्ये सहभागी होणार आहेत. तसेच करीना कपूर ही या सोहळ्यात धमाकेदार परफॉम करण्यासाठी जोरदार तयारी करत आहे.
( छायाचित्र साभार गुगल )
SD Social Media
9850603590