फिल्डिंग करताना दुखापत, वर्ल्डकप विजेत्या कॅप्टनची कारकीर्द संपुष्टात?

आयपीएलमध्ये फिल्डिंग करताना केन विल्यमसनला दुखापत झाली. त्यामुळे त्याला  आयपीएलमधुन बाहेर पडावं लागलं. त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे तो पुढचे काही महिने मैदानापासून बाहेर राहणार आहे. केन आयपीएल 2023 मध्ये गुजरात टीमकडून खेळत होता.

या हंगामातील पहिल्या सामन्यात तो चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध खेळत असताना फिल्डिंग करताना त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. गुडघ्याच्या दुखापतीनंतर त्याला मैदान तातडीनं सोडावं लागलं.

गुडघ्याच्या दुखापतीनंतर, तो आयपीएल 2023 मधून बाहेर पडला आहे आणि तो न्यूझीलंडला परतला. 5 एप्रिल रोजी त्याच्या गुडघ्याचं स्कॅनिंग करण्यात आलं. उजव्या गुडघ्यावर ऑपरेशन करावे लागेल अशी माहिती डॉक्टरांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, केन विल्यमसनची शस्त्रक्रिया येत्या तीन आठवड्यांत होणार आहे. केन विल्यमसनने सांगितले की, त्याच्या रिकव्हरीला थोडा वेळ लागेल. त्याचवेळी मैदानात परतण्याबाबतची त्याची अस्वस्थताही स्पष्टपणे दिसून येत होती. तो मैदानात परतण्यासाठी आतूर असल्याचं दिसत होतं.

केनची ही दुखापत पाहता त्याला वन डे वर्ल्डकप खेळता येईल की नाही ही मोठी शंका आहे. एवढंच नाही तर सतत होणाऱ्या दुखापतींमुळे केन क्रिकेटच्या मैदानातून बाहेर पडणार का? संन्यास घेणार का अशीही एक चर्चा सुरू झाली आहे. मात्र या सगळ्यावर अजूनही सस्पेन्स कायम आहे. येत्या काही दिवसांत केनच्या फिटनेसवर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत.

दुखापतीनंतर चाहत्यांनी केली प्रार्थना

आयपीएल 2023 मध्ये दुखापत झाली, त्यानंतर चाहत्यांनी तो लवकर बरा होऊन मैदानात खेळण्यासाठी उतरावा यासाठी प्रार्थना केली. चाहत्यांचं प्रेम पाहून केनला भरुन आल्यासारखं झालं. क्रिकेट चाहत्यांनी त्याला लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. लोकांच्या या प्रेमाने केन विल्यमसनलाही भावुक झाला.

न्यूझीलंड टीमचं वाढलं टेन्शन

वनडे वर्ल्डकपपर्यंत केन विल्यमसन बरा होणं टीमच्या दृष्टीनं गरजेचं आहे. जर तो फिट झाला नाही तर टीमचं टेन्शन वाढू शकतं. तो वनडे वर्ल्ड कप खेळणार नाही अशीच चर्चा सुरू आहे. मात्र याबाबत न्यूझीलंड टीमने अजूनही सस्पेन्स काय ठेवला आहे. वन डे वर्ल्ड कप भारतात खेळवला जाणार आहे. केन विल्यमसन न्यूझीलंड टीमसाठी हुकुमी एक्का आहे. तो टीममध्ये नसेल तर टीमचं टेन्शन आणखी वाढू शकतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.