जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्त देशातील नामवंत व्यंगचित्रकार आपापल्या व्यंगचित्रशैलीतून ‘कोरोनाविषयी जनजागृती’ करणार आहेत.
१८९५ मध्ये पहिले रंगीत व्यंगचित्र द यलो कीड प्रकाशित झाले होते, त्याची आठवण आणि व्यंगचित्रकलेचा गौरव म्हणून ५ मे हा जागतिक व्यंगचित्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. जगभरात व्यंगचित्र आणि व्यंमगचित्रकारांना मानाचे स्थात आहे. भारतीय समाजावरही व्यंगचित्राचा फार मोठा प्रभाव पडलेला आहे. बाळासाहेब ठाकरे आणि आर. के. लक्ष्मण ही दोन नावे त्यांसाठी पुरेसी आहेत. व्यंगचित्रकार या पेशाला आर.के. लक्ष्मण यांनी ओळखच नव्हे, तर प्रतिष्ठा मिळवून दिली. स्वातंत्र्यपूर्व काळात वृत्तपत्रासोबतच व्यंगचित्राचाही भारतीय समाजात उगम झाला. चित्रकला हा व्यंगचित्राचा पाया आहे आणि व्यंगचित्र ही चित्रकलेची शेवटची पायरी आहे. असे असले तरीही ही अखेरची पायरीच कलावंताची खरी कसोटी घेणारी आहे. चित्रकलेसाठी अभ्यासक्रम असला तरीही व्यंगचित्रकारितेसाठी अभ्यासक्रम नाही. व्यंगचित्रकार हा कलावंत असतो. चाणाक्षपणा, उपजत विनोदबुध्दी, परिस्थितीचे अवलोकन करुन त्यातील विसंगती आणि सुसंगती शोधण्याची क्षमता, त्यागवर चपखलपणे कमीत कमी शब्दांत लक्षवेधी रेषांच्या साहाय्याने भाष्य करण्याची हातोटी हे गुण व्यंगचित्रकारात असतात. व्यक्तिागत जीवनात तो मितभाषी असेल अथवा बोलघेवडा असेल, पण व्यंगचित्रकार म्हाणून आवश्यक गुण असल्याशिवाय तो यशस्वी होऊच शकत नाही. व्यंगचित्रकला ही चित्रकलेची शेवटची पायरी आहे, असे म्हटल्या् जाते. पण अनेक व्यंगचित्रकारांकडे पाहिल्या नंतर अनेकांना चित्रकलेचे प्राथमिक शिक्षण नसतांनाही त्यांना हे दैवी वरदान लाभलेले दिसते. म्हणूनच व्यंगचित्रातील आशयाला समृध्दि करणारी मिश्किल शब्द रचना वापरणारे व्यंगचित्रकार स्वत:ची एक शैली निर्माण करण्यात यशस्वी झालेले दिसतात. व्यंगचित्र हा एक साहित्यप्रकार म्हटला जातो. इतर साहित्यामधून जसे जीवनदर्शन होते, तसेच व्यंगचित्रांतूनही होते. मात्र ते टिपण्यावसाठी वेगळी नजर आणि रेखाटण्या्साठी वेगळा हात लागतो. व्यंगचित्रातून आलेल्या चटकदार, चमकदार कल्पना केवळ हास्यणनिर्मितीसाठी आलेल्या नसतात, त्यामागे व्यंगचित्रकाराचा गहन अभ्यास, सखोल चिन्तन असते. जीवनपध्दतीवर एका वेगळ्या दृष्टिकोनातून भाष्य केलेले असते, वेगळ्या कोनातून प्रकाश टाकलेला असतो. व्यंगचित्रकार हा स्वत:शीही संवाद साधणारा असतो. आत्म,परीक्षण करणारा असतो. समाजात वावरत असतांना, आजू-बाजूला घडणा-या घटनांचा अन्वयार्थ लावत असतो. अंतर्मुख होऊन विचार करतो आणि कल्पनाशक्ती, विनोदबुध्दी यांची जोड देऊन व्यंगचित्र रेखाटतो. त्यातील उपहास काहींना झोंबणारा असू शकतो. मात्र ही व्यंगचित्रे कालजेयी असू शकतात. गरीबी, निरक्षरता, भ्रष्टाचार, बेरोजगारी, पाणीटंचाई आणि मानवी जीवनातील दु:ख, अपमान, वियोग, उपेक्षा, अपेक्षाभंग, अपयश, निन्दा, दुरावा, भीती, काळजी या समस्या जोपर्यंत आहेत तो पर्यंत अशी व्यंगचित्रे येतच राहणार. अशा परिस्थितीत आपल्यार जीवनात हास्य आणि विनोद नसता तर आपले जगणे बेचव झाले असते. व्यंगचित्रातून मिळणारा आनंद हा माणसाला त्याचे दु:ख क्षणभर का होईना विसरायला भाग पाडतो. म्हणूनच जीवनानंद देणा-या या व्यंगचित्रक्षेत्रातील सर्व मुशाफिरांना मानाचा मुजरा.