रुग्णालयाऐवजी गेली बागेश्वर धाममध्ये, किडनीच्या आजाराने त्रस्त महिलेचा मृत्यू

बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांच्या अडचणीत भर टाकणारी घटना घडली आहे. बागेश्वर धाममध्ये एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येतेय. उत्तर प्रदेशच्या फिरोजाबाद जिल्ह्यातील महिलेचा मृत्यू झाल्याचं म्हटलं जातंय. जवळपास महिनाभर महिला पतीसोबत बागेश्वर धाममध्ये वास्तव्यास होती. किडनीच्या आजाराने त्रस्त असलेली महिला उपचारासाठी बागेश्वर धाममध्ये आली होती. पण तिच्या मृत्यूमुळे आता खळबळ उडाली आहे.

महिलेला रुग्णालयात योग्य उपचार न मिळाल्याने ती बागेश्वर धाममध्ये आल्याचं म्हटलं जातंय. तिथे तिच्या तब्येतीत फरकही पडला होता पण अचानक त्रास वाढला आणि तिचा मृत्यू झाला असल्याचं पतीने म्हटलं आहे. धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर पत्नीची श्रद्धा होती म्हणून तिला बागेश्वार धाममध्ये आणलं होतं असं पतीने सांगितलंय.

दरम्यान, एका बाजूला महिलेच्या मृत्यूने खळबळ उडाली असतानाच बागेश्वर धामच्या प्रेत दरबारातून एक तरुणी बेपत्ता झालीय. उत्तर प्रदेशच्या देवरिया जिल्ह्यातल्या देवकली जयराम इथली ही तरुणी आहे. नीरज मौर्या असं मुलीचं नाव असून १२ फेब्रुवारीपासून ती बेपत्ता आहे.

बागेश्वर बाबा यांनी आपण मनशक्तीद्वारे दरबारातील कोणत्याही व्यक्तीचं नाव, गाव आणि त्याचा पत्ता सांगू शकतो. तो कशाला या दरबारात आला हेसुद्धा सांगू शकतो असा दावा केला होता. गुरूंकडून आपल्याला दिव्यशक्ती मिळाल्याचा दावा नागपूरमध्ये त्यांनी केल्यानतंर चर्चा झाली होती. तेव्हा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे उपाध्यक्ष श्याम मानव यांनी बागेश्वर बाबांना आव्हान दिला होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.