ॐ ऊर्ध्व भू फट् । ॐ नमः शिवाय । ॐ ह्रीं ह्रौं नमः शिवाय । ॐ नमो भगवते दक्षिणामूर्त्तये मह्यं मेधा प्रयच्छ स्वाहा । ॐ इं क्षं मं औं अं । ॐ प्रौं ह्रीं ठः । ॐ नमो नीलकण्ठाय । ॐ पार्वतीपतये नमः । ॐ पशुपतये नम:।या मंत्राचा जप महाशिवरात्रीच्या दिवशी शक्यतो रुद्राक्ष जपमाळासोबत करावा. या मंत्राचा किमान 11 वेळा जप करावा. या मंत्राचा जप केल्यानं सर्व मनोकामना पूर्ण होतात, असे मानले जाते.
ॐ अघोराय नम: ॐ शर्वाय नम: ॐ विरूपाक्षाय नम: ॐ विश्वरूपिणे नम: ॐ त्र्यम्बकाय नम: ॐ कपर्दिने नम: ॐ भैरवाय नम: ॐ शूलपाणये नम: ॐ ईशानाय नम: ॐ महेश्वराय नम:।या मंत्रात भगवान शंकराची 10 वेगवेगळी नावे सांगितली आहेत. या मंत्राच्या जपाने मनोकामना पूर्ण होतात आणि व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो. तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी किंवा दर सोमवारी या नावांचा जप करू शकता.
ॐ तत्पुरुषाय विदमहे, महादेवाय धीमहि तन्नो रुद्र: प्रचोदयात्।या मंत्राला रुद्र गायत्री मंत्र म्हणतात. धार्मिक मान्यतेनुसार, महाशिवरात्रीच्या दिवशी या मंत्राचा जप केल्यानं जीवनातील सर्व दु:ख दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होतात.
नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्माङ्गरागाय महेश्वराय । नित्याय शुद्धाय दिगम्बराय तस्मै नकाराय नमः शिवाय।महाशिवरात्रीच्या दिवशी पूजेदरम्यान या मंत्राचा जप अवश्य करावा. या मंत्राचा जप केल्याने मानसिक शांती आणि एकाग्रता प्राप्त होते. हा मंत्र माणसाला संकटांपासून मुक्त करतो आणि महादेवाचा आशीर्वादही मिळतो.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. sdnewsonline त्याची हमी देत नाही.)