देशावर जेव्हा एखादे मोठे संकट येते त्यावेळी फक्त सरकार व प्रशासनावरच अवलंबून राहून चालत नाही. तर समाजसेवी संघटना आणि सर्वसामान्य नागरीकांना सुध्दा आपले कर्तव्य पार पाडणे गरजेचे असते.हाच उदात्त दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून संभाजी ब्रिगेड मागील २५ वर्षापासून कार्य करीत आहे.सध्या देशात कोरोनाच्या संकटाने उग्र रुप धारण केले आहे.कोरोनाच्या आजारावर महत्वपूर्ण असलेल्या रेमडेसीवीर इंजेक्शनचा तुटवडा सर्वत्र निर्माण झाला आहे.अशा संकट समयी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अॕड.मनोजदादा आखरे यांनी पुढाकार घेवून हिंगोली जिल्ह्यातील लोकांच्या मदतीला आपली जबाबदारी स्वीकारत धावून गेले आहे. ह्याकरिता त्यांना आपल्या सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मित्रमंडळींचे चांगले सहकार्य मिळाले आहे.या सर्वांच्या सहकार्यामुळेच हे होवू शकले असे ते आवर्जुन सांगतात.
मा.मनोजदादांनी रेमडेसीवीर इंजेक्शनच्या कमतरतेविषयी हिंगोलीचे जिल्हाधिकारी यांच्यासोबत चर्चा केली.त्यांच्यासोबत नियोजन करुन रेमडेसीवीरची गरज कशी पूर्ण करता येईल याबद्दल आखणी केली.नंतर डायरेक्ट रेमडेसीवीर उत्पादक कंपनीच्या नोडल स्टॅाकीस्ट सोबत चर्चा करुन दहा हजार इंजेक्शनची मागणी नोंदविण्यात आली.परंतु कंपनीला आधी पैसे पाहिजे होते.रक्कमही काही लहानसहान नव्हती. रेमडेसीवीर इंजेक्शनसाठी दोन कोटी एकोणविस लाख विस हजारांचा निधी कंपनीला द्यायचा होता व मगच इंजेक्शन मिळणार होते.मनोजदादांनी हिंमत न सोडता आपल्या परिचयाचा उपयोग करुन धाकटे भाऊ जिल्हापरिषद ऊपाध्यक्ष मनिष आखरे,विधीज्ञ ॲड मनिष साकळे मित्रमंडळी,राजकीय,सामाजिक कार्यकर्ते यांच्या सहकार्यातून रेमडेसीवीर इंजेक्शनसाठी दोन कोटी एकोणविस लाख विस हजारांचा निधी परत करण्याच्या तत्वावर ताबडतोब उभा केला.तो निधी आखरे मेडीकल च्या नावाने कंपनीला सुपूर्द करुन १० हजार इंजेक्शनची व्यवस्था केली व खऱ्या अर्थाने संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांचा समाजसेवी दृष्टीकोन जगासमोर ठेवला.
या कामात सहकार्य केलेल्या सर्वांचे मनोजदादांनी कृतज्ञतापूर्वक आभार मानले आहेत.विशेषता: कळमनुरी मतदारसंघाचे शिवसेना आमदार शिवश्री संतोषजी बांगर यांनी मनोजदादांच्या व मित्रपरिवारांच्या विनंतीला मान देत आपली ९० लाखांची एफ.डी.(Fixed Deposit) मोडून इंजेक्शनसाठी पैसे दिले व समाजासमोर खूप मोठे आदर्शवादी उदाहरण निर्माण केले.आता हिंगोली मधील रेमडेसीवीर इंजेक्शनचा तुटवडा संपुष्टात आला असून कोरोना रुग्णांची तारांबळ थांबली आहे व रुग्णांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
तसेच हिंगोली जिल्हा रूग्णालयाला ना नफा – ना तोटा या तत्वावर रेमडिसीवीर ईंजेक्शनचा पुरवठा करण्यात येत आहे.अॕड.मनोजदादा आखरे व संभाजी ब्रिगेडच्या या महान कार्याचे सर्वत्र कौतुक होत असून सर्वांनी या टीमला धन्यवाद दिले आहेत.कोणत्याही संकटात लोकांसाठी तत्पर राहून सहकार्य करण्याचा निर्धार यावेळी मनोजदादा व मित्रपरिवारांनी व्यक्त केला.तसेच इतर जिल्ह्यातही सर्व सामाजिक,राजकीय कार्यकर्त्यांनी एकत्र येवून लढा दिल्यास निश्चितच आपण कोरोनाच्या संकटावर मात करु शकतो असा आशावाद यावेळी अॕड.मनोजदादा आखरे यांनी व्यक्त केला.
राजकीरण देशमुख, हिंगोली