आश्चर्य! औषध नाही, फक्त श्लोक वाचून रुग्ण ठणठणीत; डॉक्टरांनीच सांगितलं कसं शक्य झालं

आजार म्हटलं की आपण डॉक्टरांकडे जातो. डॉक्टर आपल्याला तपासतात, काही तपासण्या करायला सांगतात, आपल्या आजाराचं निदान करतात आणि त्यानुसार उपचार करतात. औषधं देतात, इतरही उपाय सांगतात. पण फक्त श्लोक वाचून कोणता रुग्ण बरा झाल्याचं तुम्ही कधी ऐकलं आहे का? एका रुग्णालयात अशाच पद्धतीने रुग्णांवर अशा अनोख्या पद्धतीने उपचार केले जात आहेत आणि या उपचाराने रुग्ण बरे झाल्याचा दावाही डॉक्टरांनीच केला आहे.

उत्तर प्रदेशच्या मेरठ जिल्हा रुग्णालयात रुग्णांना श्लोक सांगून त्यांच्या समस्यांवर उपाय दिला जात आहे. इथल्या काऊन्सिंग सेंटरला मन कक्ष असं नाव देण्यात आलं आहे. जिथं  मानसिक समस्या, मानसिक आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्ण येतात. त्यांच्यावर अशा अनोख्या पद्धतीने उपचार केले जात आहेत. सध्याच्या घडीला तणाव, चिंता यांनी कित्येक लोक ग्रस्त आहेत. या मानसिक समस्यांसाठी, आजारांसाठी समुपदेशक आणि मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेतली जाते. या रुग्णालयातही असे रुग्ण आले की त्यांना रामचरितमानस श्लोक वाचायला दिले जातात. रुग्णांच्या मनात ज्या काही वेदना, दुःख आहेत, ते दूर करण्यासाठी रामचरितमानसमधील श्लोकांची मदत घेतली जाते.

बोलताना रुग्णालयातील क्लिनिकल सायकोलॉजिस्ट डॉ. विभा नागर यांनी सांगितलं की, 2018 साली मेरठ जिल्हा रुग्णालयात मन कक्षाची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून रामचरितमानसमधील श्लोकांच्या माध्यमातून रुग्णांच्या समस्यांवर उपाय देत आहोत. रुग्णांच्या मनात नेमकं काय चाललं आहे ते काऊन्सलिंगदरम्यान समजतं. तणाव किंवा डिप्रेशनची बरीच कारणं जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो. समस्या समजल्यानंतर रामचरितमानसच्या कोणत्या श्लोकात त्यावर उपाय आहे, हे त्या रुग्णाला सांगितलं जातं. आधीपासूनच आपले भारतीय ग्रंथ मानसिक समस्या कमी करण्यात मदत करतात.

आधीच्या एका वृत्तानुसार ज्यात मेरठच्या एका खासगी रुग्णालयात ऑपरेशन थिएटरमध्ये रुग्णांच्या उपचाराआधी हवन केलं जातं. यामुळे ऑपरेशन थिएटर विषाणूरहित होतं, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.