टॅक्स वाचवण्यासाठी सचिनची ‘आयडिया’, मास्टर ब्लास्टर झाला ‘अभिनेता’

इनकम टॅक्स हा नोकरदार आणि मध्यमवर्गीय लोकांना सर्वाधिक त्रास देणारा शब्द आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पामध्ये करदात्यांना दिलासा दिला. टॅक्स वाचवण्यासाठी मध्यमवर्गीय नोकरदार वेगवेगळ्या आयडिया लढवतो. फक्त मध्यमवर्गीयच नाही तर प्रत्येक जण आपली कमाई स्वत: जवळ ठेवण्यासाठी आग्रही असतो. भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरही याला अपवाद नाही.

इनकम टॅक्समधून सूट मिळवण्यासाठी सचिन तेंडुलकरनेही शक्कल लढवली होती. 2011 साली सचिनला अनेक मल्टिनॅशनल कंपन्यांकडून 5.92 कोटी रुपये कमाई झाली. टॅक्स वाचवण्यासाठी त्याने आयटी ऍक्ट 80RR अंतर्गत 1.77 कोटी रुपये सूट मिळण्यासाठीचा दावा केला. या नियमानुसार जर एखाद्या अभिनेत्याने आपल्या कामातून परदेशातून पैसे कमावले तर तो कमाईच्या एका भागावर सूट मागू शकतो.

आपली ही कमाई जाहिराती आणि स्पॉन्सरशीपच्या माध्यमातून झालेली आहे, क्रिकेट खेळल्यामुळे नाही. या कमाईचं साधन क्रिकेट नाही तर अभिनय आहे, असा दावा सचिनने केला होता.

सचिनचा अभिनेता असल्याचा दावा टॅक्स ट्रिब्यूनलने मान्य केला. जाहिरात करण्यासाठी सचिनला लाईट आणि कॅमेराचा सामना करावा लागला, जे अभिनेत्याचं काम आहे, असं टॅक्स ट्रिब्यूनलने सांगितलं. सचिनने टॅक्स वाचवण्यासाठी ही शक्कल लढवली असली तरी तो 2010 साली सर्वाधिक टॅक्स भरणारा खेळाडू होता.

2023-24 च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नव्या टॅक्स स्लॅबची घोषणा केली आहे. या स्लॅबमध्ये नोकरदार मध्यमवर्गीयांना दिलासा मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.