पंतप्रधान नरेंद्र मोदी २७ जानेवारी रोजी ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद साधणार आहेत, अशी घोषणा शिक्षण मंत्रालयाने मंगळवारी केली.
नवी दिल्लीतील तालकटोरा इनडोअर स्टेडियममध्ये पंतप्रधान संवाद साधणार आहेत. शिक्षण मंत्रालयाने मंगळवारी यासंदर्भात ट्वीट केले. १६ फेब्रुवारी २०१८ रोजी याच स्टेडियममध्ये शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसोबत पंतप्रधानांच्या संवादात्मक कार्यक्रमाची पहिली आवृत्ती आयोजित करण्यात आली होती.