हल्ली लहान मुलांमध्येही मोबाईल वापराचं प्रमाण वाढलं आहे. पब्जीने तर सर्वांनाच वेड लावलं आहे. पब्जीच्या नादात मुलं काय काय करतात याबाबत बरीच प्रकरणं समोर आली आहेत. यानंतर आता आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
पब्जी गेमच्या व्यसनामधून 15 वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बीड जिल्ह्यात उघडकीस आली. कृष्णा परमेश्वर साळवे, असे मृत मुलाचे नाव आहे. कृष्णाने पब्जी या गेमच्या व्यसनातून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.
आष्टी तालुक्यातील बीडसांगवी येथील एका माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या कृष्णा परमेश्वर साळवे यांचे वडील ऊसतोडणीला गेल्यामुळे कृष्णा आणि आई दोघेच घरी होते. तीन दिवसांपूर्वी तो शाळेच्या सहलीला गेला होता. पहाटे पाच वाजेच्या सुमारास तो घरी परतला.