जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. दरम्यान जळगाव जिल्हा दूध संघाची निवडणूक नेत्यांसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. मागच्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे विरूद्ध गिरीष महाजन आणि गुलाबराव पाटील असा वाद होताना दिसत आहे. दरम्यान एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप होतेय. जिल्हा दूध संघासाठी आज मतदान होणार आहे. अशातच एकनाथ खडसे यांनी गिरीष महाजन आणि गुलाबराव पाटील यांना खोक्यावरून डिवचलं आहे. यावर गिरीष महाजन यांनी खडसेंवर आरोप केले आहेत.
जळगाव जिल्हा दूध संघात तुम्ही सात वर्षात काय दिवे लावले तूप खाल्लं, लोणी खाल्लं त्यामुळे खडसेंनी पराभवाचे कारण शोधू नये असा पलटवार गिरीश महाजन यांनी खडसेंवर केला. दुसऱ्यावर आरोप करून आपण म्हणता खोके वाटले, पेट्या वाटल्या तुम्ही काय आहात हे लोकांना सगळं माहिती आहे.
आता सगळे लोक तुम्हाला कंटाळलेले आहेत तुम्ही सात वर्षात काय दिवे लावलेले सर्व जनतेला माहिती आहे. तुमचे काही लोक जेलमध्ये अटकेत आहेत त्यामुळे तुम्ही आता काही म्हणाला तर तुमचा पराभव हा अटळ आहे. लोकांनी ठरवलं आहे तुम्हाला दूध संघातून बाहेर काढायचं आहे. असा टोला मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना लगावला.
खडसेंवर नोकरी भरती घोटाळ्याचे आरोप
जिल्हा दूध संघातील नोकर भरती प्रकरणातील गैरव्यवहाराच्या अनेक ऑडिओ क्लिप माझ्याकडे असल्याचं सांगत भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी एकनाथ खडसे यांना इशारा दिला होता. यावरून एकनाथ खडसे यांनी ऑडिओ क्लिप किंवा काही पुरावे आहेत तर निवडणुकीत लोकांच्या समोर मांडायला हवे होते, असं त्यांनी म्हटलं. माझ्या विरोधातील व्हिडिओ किंवा ऑडिओ रेकॉर्डिंग असेल तर त्याचा निवडणुकीत वापर करणार कर ना… असा एकेरी उल्लेख करत एकनाथ खडसे यांनी भाजप आमदार मंगेश चव्हाण यांना उत्तर दिले आहे.