२०व्या शतकात गांधीजी, पटेल; २१व्या शतकात मोदी ; गुजरातमध्ये राजनाथ सिंहांचे विधान

 ‘‘विसाव्या शतकात महात्मा गांधी व सरदार वल्लभभाई पटेल हे गुजरातच्या अस्मिता-अभिमानाचे प्रतीक होते. आता एकविसाव्या शतकात गुजरातचा सन्मान व अस्मितेचे प्रतीक म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी उदयास आले आहेत,’’ असे गौरवोद्गार संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी येथे बुधवारी काढले. १ डिसेंबर रोजी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान होणार आहे. त्याच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सिंह म्हणाले, की काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदींना उद्देशून केलेले ‘रावण’ संबोधन ही अवघ्या काँग्रेस नेतृत्वाची मानसिकता दर्शवते. मोदी हे गुजरातचा सन्मान-अभिमान आहेत. मात्र त्यांच्यासाठी काँग्रेसकडून अशी वाईट भाषा वापरली जात आहे. पंतप्रधानांसाठी असे अपमानास्पद शब्द वापरणाऱ्यांना गुजरातची जनता चोख प्रत्युत्तर देईल. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर टीका करताना ‘मौनीबाबा’ हा शब्द भाजप नेते वापरतात, याबद्दल विचारले असता राजनाथ म्हणाले, की हा अपशब्द नाही. मात्र पंतप्रधानांसाठी ‘रावण’ आणि ‘नीच’ असे आक्षेपार्ह अपशब्द विरोधकांनी वापरले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.