ठाकरे गटातून शिंदे गटात इनकमिंग सुरूच आहे. आतापर्यंत अनेक आमदार, खासदार तसेच पदाधिकांऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी ठाकरे गटाची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश केला आहे. हा ठाकरे गटासाठी आणखी एक धक्का मानण्यात येत आहे.
शेकडो कार्यकर्त्यांसह प्रवेश
माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी सोमवारी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह ठाकरे गटाची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश केला. आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी सोमवारी शिंदे गटात प्रवेश केला. बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये त्यांना उपनेतेपद तसेच प्रवक्तेपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
भाजपमधून शिवसेनेत
कृष्णा हेगडे यांनी वर्षभरापूर्वीच भाजपमधून शिवसेनेत प्रवेश केला होता. पाच महिन्यांपूर्वी शिवसेनेत उभी फूट पडली. ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये शिवसेनेचं विभाजन झालं. आतापर्यंत कृष्णा हेगडे हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत होते. मात्र आजा त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश केला आहे. दरम्यान कृष्णा हेगडे हे काँग्रेसचे देखील आमदार राहिले आहेत.