थकवा-अशक्तपणा घालवण्यासाठी महिलांनी घरच्या-घरी करा हे 5 उपाय

महिलांना अनेकदा थकवा, अशक्तपणा, मूड बदलणे, मासिक पाळीच्या आसपास ब्लोटिंग यासारख्या समस्या सुरू होतात. थकव्यामुळे महिलांच्या दैनंदिन दिनचर्येवरही परिणाम होऊ शकतो, थकवा आणि अशक्तपणा बराच काळ जाणवत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. संशोधनानुसार, थकवा आणि अशक्तपणा जाणवण्याचे एक कारण म्हणजे मासिक पाळीपूर्व डिसफोरिक डिसऑर्डर. हा त्रास मासिक पाळी येण्याच्या 7 किंवा 10 दिवस आधी सुरू होतो. त्याच्या मुख्य लक्षणांमध्ये खूप थकवा येणे किंवा अशक्त वाटणे, राग येणे, चिडचिड होणे ही लक्षणे दिसू शकतात.

संतुलित आहार घ्या – हेल्थलाइनच्या माहितीनुसार, महिलांनी संतुलित आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यांनी आहारात कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन दोन्ही असलेल्या पोषक तत्वांचा समावेश करावा. यामुळे पचनक्रिया बरोबर राहते. संतुलित आहार नियमित घेतल्यास थकवा आणि अशक्तपणा कमी होतो.

नियमित व्यायाम करा – महिलांसाठी नियमित व्यायाम करणे खूप महत्त्वाचे आहे. यामुळे शरीरात एनर्जीची पातळी चांगली राहते. तज्ज्ञांच्या मते, दररोज व्यायाम करून थकवा आणि अशक्तपणा सहज दूर केला जाऊ शकतो.

भरपूर पाणी प्या – शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. निर्जलीकरणामुळे ऊर्जा कमी होते आणि शरीरात पेटके येतात. अशक्तपणा आणि थकवा दूर करण्यासाठी भरपूर पाणी पिणे हा एक चांगला पर्याय आहे. भरपूर पाणी पिण्याचे इतरही अनेक फायदे आहेत. थंडीच्या दिवसात तहान कमी लागत असली तरी लक्षात पुरेसे पाणी पिणे गरजेचे आहे.

कॅफिन पदार्थ टाळा – कॅफीन आपल्या काही काळ ऊर्जा देऊ शकतात, परंतु ते शरीरासाठी हानिकारक आहे. कॅफिन पदार्थांपासून शक्य तितके दूर रहा. रात्रीच्या जेवणानंतर कॅफिनचे सेवन टाळण्याचा प्रयत्न करा.

चांगली झोप – थकवा आणि अशक्तपणा टाळण्यासाठी पुरेशी झोप घेण्याची महिलांना सर्वाधिक गरज असते. शांत झोपेसाठी महिला मेडिटेशनची मदत घेऊ शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.