“लतादीदी म्हणजे ईश्वराचा अंश, नेहरूंपासून ते मोदींपर्यंत सर्वांनाच…”; देवेंद्र फडणवीसांनी दिला आठवणींना उजाळा

गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार २०२० व २०२१ वितरण समारंभ मुंबईत पार पडला. यावेळी गायिका उषा मंगेशकर आणि बासुरी वादक पंडित हरिप्रसाद चौरसिया यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, मंत्री उदय सामंत, मंत्री दीपक केसरकर या समारंभाला उपस्थित होते.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “लतादीदींच्या गळ्यात ‘सरस्वती’चा वास होता. मराठी मातीत जन्मलेल्या लतादीदी या भारत देशाच्या रत्न झाल्या, ही आपल्या महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. लता मंगेशकर संगीत महाविद्यालयाचे उद्घाटन पार पडलं आहे. त्याच्या कामात काही अडथळे आले होते. मात्र, देवेंद्र फडणवीस आणि मी अडथळे पार करण्याची शर्यत आम्ही जिंकत चाललो आहोत. त्यामुळे कोणतेही अडथळे आता महाविद्यालयाच्या कामात येणार नाही,” असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं.

तर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, “करोनात वाईट सर्वांना पाहावे लागले. मात्र, करोनाचे एका गोष्टीसाठी आभार मानेल, कारण पुरस्काराचे वितरण झालं नाही. त्यामुळे एवढ्या महान व्यक्तींना पुरस्कार देण्याचं भाग्य मला आणि एकनाथ शिंदे यांना मिळालं. लतादीदी आणि आशाताईंसोबत उषाताईंनी आपला ठसा उमटवला. लोकांना त्यांचा आवाज भावला.”

“लतादीदींचं सर्व अनमोल आहे”

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने लता मंगेशकरांच्या नावाने आंतराष्ट्रीय संगीत विद्यालयाची सुरुवात करण्यात आली आहे. अतिशय सुंदर आणि आधुनिक अशी इमारत बांधण्यात येणार आहे. लतादीदींचं सर्व अनमोल आहे, त्याच मोल होऊ शकणार नाही. काही अडथळे आले होते, ते मुख्यमंत्र्यांनी दूर केले आहेत.सर्व संगीताच्या प्रकाराचे या महाविद्यालयाच्या माध्यमातून शिक्षण दिलं जाणार आहे. पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरुंना आनंद देऊन त्यांच्या डोळ्यात अश्रू पाहणाऱ्या दीदी होत्या. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदींना भूरळ घालणाऱ्या सुद्धा दीदी होत्या. दीदींचा हा प्रवास अतिशय थक्क करणारा आहे. त्यांच्यामध्ये ईश्वराचा अंश होता,” असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.