मुंबई पोलिसांचे आदेश, 10 ऑगस्टपर्यंत ‘या’ वस्तूंच्या वापरावर बंदी

राष्ट्रीय हिताला बाधा पोहचविणाऱ्या तसेच राष्ट्रद्रोही कारवायांसाठी कारणीभूत ठरतील, असे घटकांवर बंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. यामध्ये एअर मिसाईल, पॅराग्लाईडर्स, रिमोट कंट्रोल, मायक्रोलाईट, एअर क्राफ्ट, ड्रोन यांच्या वापरावर बंदी आणण्यात आली आहे. बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दि. 10 ऑगस्ट 2022 पर्यंत हे आदेश लागू करण्यात आले असल्याचे पोलीस उपायुक्त संजय लाटकर यांनी सांगितले आहे.

आदेशाच्या पालन न केल्यास …

मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कुठेही कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही, सामान्य जनतेला धोका उत्पन्न होणार नाही, अति महत्त्वाच्या व्यक्तींना धोका निर्माण होणार नाही, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होवू नये याकरीता हे आदेश लागू आहेत.

यांसाठी हा नियम नाही – 

दरम्यान, पोलिसांनी हा आदेश लागू केला असला तर ज्यांनी या कालावधीत पूर्व लेखी परवानगी घेतली आहे, त्या लोकांसाठी हा आदेश शिथिल असेल, असेही या परिपत्रकामध्ये स्पष्ट केले आहे. तसेच या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय दंड संहितेच्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल

यावर बंदी –

यामुळे एअर मिसाईल, पॅराग्लाईडर्स, रिमोट कंट्रोल, मायक्रोलाईट, एअर क्राफ्ट, ड्रोन यांच्या वापरावर बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 10 ऑगस्ट 2022 पर्यंत बंदीचे आणण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.