फेसबुकमध्ये लवकरच मोठा बदल; न्यूज फीड दिसणार नव्या स्वरूपात

फेसबुक हा सर्वांत लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. जगभरात अब्जावधी लोक फेसबुक वापरतात. प्रामुख्यानं कंटेट, फोटो, व्हिडिओ शेअरिंगसाठी फेसबुकचा वापर होतो. फेसबुक आपल्या युजर्ससाठी सातत्यानं नवीन फीचर्स आणत असतं. फेसबुकने आता न्यूज फीडमध्ये एक मोठा बदल केला आहे. गुरुवारी या बदलाची घोषणा मेटा या फेसबुकच्या पेरेंट कंपनीकडून करण्यात आली. हा बदल युजर्ससाठी उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. आता युजरला होम आणि फीड या नावाची दोन स्वतंत्र टॅब उपलब्ध होणार आहेत. `आज तक`ने या विषयीची माहिती दिली आहे.

फेसबुककडून सातत्याने फीचर अपडेट केली जातात. गेल्या काही वर्षांत फेसबुक अनेक नावीन्यपूर्ण फीचर्सदेखील युजर्ससाठी आणली आहेत. आता मेटा कंपनीने न्यूज फीडमध्ये मोठा बदल करण्याची घोषणा केली आहे. फेसबुकचं हे नवं फीचर आयओएस आणि अँड्रॉइड अशा दोन्ही प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध असेल. जेव्हा तुम्ही अ‍ॅप सुरू कराल. तेव्हा होम आणि फीड अशा दोन स्वतंत्र टॅब तुम्हाला होम स्क्रीनवर दिसू शकणार आहेत.

मेटा कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार, हा नवा अपडेट येत्या काही आठवड्यांमध्ये जगभरात रोलआऊट होईल. मेटाला त्यांचा फेसबुक हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टिकटॉकसारखा बनवायचा आहे. त्यामुळे हे नवे अपडेट आणले जात आहेत. टिकटॉकचा अल्गोरिदम युजर्स जो कंटेट जास्त पाहतात, त्यानुसार कंटेट दर्शवतो. आता फेसबुकच्या नवीन सेटिंगमध्ये हा पर्याय उपलब्ध असेल. युजर्सना या सेटिंगचा शॉर्टकट लवकरच अ‍ॅपमध्ये दिसेल.

होम टॅबमध्ये युजर्सना रील्स, स्टोरीज आणि अन्य पर्सनलाइज्ड कंटेट पाहता येईल. दुसऱ्या फीड नावाच्या टॅबमध्ये युजर्सना मित्रांच्या पोस्ट, ग्रुप्स, फेसबुक पेज आणि आवडीचा कंटेट याविषयी माहिती मिळेल. यात सेक्शनमध्ये युजर्स कोणतंही सजेशन मिळणार नाही. युजर्स ज्या टॅबवर सर्वाधिक वेळ असतील, ती युजर्सना सर्वप्रथम दिसेल. तसंच टॅब्ज पिन करण्याचा पर्यायही उपलब्ध असेल. यामुळे टॅब्जची पोझिशन बदलणार नाही.

ही फीड अगदी एखाद्या डिस्कव्हर इंजिनप्रमाणे काम करतील. आता युजर्सना होम या टॅबमध्ये केवळ मित्र आणि कुटुंबीयांच्या पोस्ट दिसू शकतील. तसेच युजर्सना रेकमेंडेशनदेखील दिसतील. फीड टॅबमध्ये युजर्सना अ‍ॅड्स दिसतील. दोन्ही टॅब्जमध्ये बहुतांश कंटेट एकसारखा असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

“हे दोन्ही टॅब्ज आयओएस आणि अँड्रॉइड अशा दोन्ही व्हर्जनसाठी असतील. युजर्सना या टॅबचे शॉर्टकट लवकरच दिसतील. यातला कंटेट सतत बदलत राहतील”, अशी माहिती मेटा कंपनीनं प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.